shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बल्हारपूरचा बहुचर्चित तलाठी रोहितसिंग चव्हाण अखेर निलंबित!


▪️तलाठी दप्तर मधील निष्काळजीपणा पटवा-यास भोवला !
▪️सुरज ठाकरे व प्रिया झांबरेंनी केल्या होत्या त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी !

▪️चंद्रपूर▪️-किरण घाटे -▪️

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण व वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरण सातत्याने चंद्रपूर जिल्ह्यात गाजत असुन सदरहु प्रकरणा बाबत युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व याच पक्षाच्या पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिवांसह नागपूरचे विभागीय आयुक्त, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, बल्हारपूरचे महसूल उपविभागीय अधिकारी ,राजूरा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदार बल्हारपूर व पोलिस स्टेशन बल्लारपूर यांचे कडे लेखी स्वरुपात निवेदने सादर करून चौकशीची मागणी केली होती.



दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने बल्हारपूर तहसीलदार यांना दि.१जूनला पोलिस स्टेशन बल्हारपूर कडून एक लेखी पत्र देण्यात आले असुन त्यात बल्हारपूर साजाचे पटवारी  रोहितसिंग चव्हाण यांना  प्रकरणातील संपूर्ण रेकॉर्ड घेऊन चौकशी व बयानासाठी हजर करण्या बाबत नमुद करण्यात आले होते  .

त्याच बरोबर बल्हारपूरचे एसडीओ यांनी देखिल तलाठी चव्हाण यांचा संपूर्ण तलाठी रेकॉर्ड तपासणी साठी आपल्या कार्यालयात बोलाविला होता .दरम्यान रेकॉर्ड तपासणी अंती रोहित सिंग चव्हाणवर पटवारी दप्तर मधील निष्काळजीपणाचा ठपका ठेवीत त्यांना बुधवारी संध्याकाळी एका आदेशाने  बल्हारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी- पाटील यांनी निलंबित केल्याचे विश्वासनिय वृत्त प्राप्त झाले आहे. 

या प्रकरणाच्या अनुषंगाने  बयानासाठी सामाजिक कार्यकर्त्या तथा युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱी प्रिया झांबरे यांना तहसीलदार संजय राईंचवार यांनी बयानासाठी तहसील कार्यालयात बोलाविले असल्याचे समजते .त्या बाबतीत आपणांस एक पत्र तहसील कार्यालयातुन प्राप्त झाले असल्याचे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलतांना काल चंद्रपूर मुक्कामी सांगितले.      
उपरोक्त  तलाठी दप्तर मधील रेकार्ड खोडतोड प्रकरणात  यूवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे निवेदने सादर केली होती.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.

◼️सदरहु प्रकरणात महसूल विभागाचे तहसीलदार संजय राईंचवार हे  चौकशी करीत आहे .त्यांची चौकशी अद्याप  सुरु असल्याचे समजते .सातत्याने या प्रकरणात तक्रारी वाढत गेल्याने बल्हारपूर उपविभागीय कार्यालयाच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी -पाटील यांनी बल्हारपूरचे तलाठी रोहित सिंग यांचेवर   निलंबनाची कारवाई केल्याचे बोलल्या जाते. या संपूर्ण प्रकरणात आपला दोष नसल्याचे पटवारी बुवा सांगत जरी असले तरी यात त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते.

◼️सन १९९०मध्ये तलाठी रोहित सिंग चव्हाण हे बल्लारपुर तलाठी दप्तर मध्ये कार्यरत नसतांना त्यांच्या स्वाक्षरीचा एक नकाशा आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
close