shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर- निमगाव येथे इयत्ता बारावी( एच एस सी )परीक्षा २०२२ च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

निर- निमगाव येथे इयत्ता बारावी( एच एस सी )परीक्षा २०२२ च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

  कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने इयत्ता बारावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी व पालकांचा संस्थेच्या वतीने सन्मान.

     इंदापूर प्रतिनिधी:    कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान निर -निमगाव. तालुका इंदापूर जिल्हा पुणे. यांच्या वतीने इयत्ता बारावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी व पालकांचा संस्थेच्या वतीने संस्थापक  दत्ताजीराव सोपान घोगरे यांचे शुभहस्ते विद्यार्थी व पालक यांचा गुणगौरव करण्यात आला.
  यावेळी बोलताना अध्यक्ष म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये शिकून स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा तसेच गावाचा व देशाचा नावलौकिक मिळवावा.
       या कार्यक्रमात खालील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
 1.कु.प्रगती दत्तात्रय महानवर : 91.33 %
2. निखिल सिद्धेश्वर गरगडे :90.83%
3. ओम सतीश वनवे :88.50%
4. कु. मेघा दत्तात्रय कुंभार :85%
5. रोहन कार्तिक सावळकर:77%
        सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष  रणजीत घोगरे. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  गरगडे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  पिसे सर, माजी उपसरपंच  दीपक जाधव,  वैजनाथ साळुंखे  बाळासाहेब जाधव,  मारुतराव गरगडे, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष  गणेश घोगरे, योगेश चांगण, ज्ञानदेव गरगडे, माता-पालक श्रीम. स्वाती महानवर,  सिद्धेश्वर गरगडे,  सतीश वनवे , दत्तात्रय कुंभार,  कार्तिक सावळकर , मोहनराव जाधव,  श्रावण घोडके   कांतीलाल शिंदे,  बाळासाहेब देवडे , शशिकांत चांगण,  राहुल गरगडे , पोपट पवार व सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
close