*सावित्रीच्या लेकींची दहावीत भरारी*..
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
*इंदापूर प्रतिनिधी ( *दि.१७*) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा (इ.१० वी) ऑनलाईन निकाल ( दि.१७) रोजी जाहीर झाला.त्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल१००% टक्के लागला. या वर्षीही १००% निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली. यामध्ये ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले,तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात अनुक्रमे प्रथम क्रमांक कु.वैष्णवी कांतीलाल शेंडगे ( ८४.८०%)
द्वितीय क्रमांक कु.प्रतिक्षा शिवाजी बळवंत ( ८३.२०%) तृतीय क्रमांक कु. कोमल बंडू बल्लया ( ८०.६०%) शेकडा गुण याप्रमाणे यश प्राप्त केले आहे. विद्यालयातून परीक्षेला एकूण ३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या ह्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे,उपाध्यक्ष तानाजी मिसाळ,कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे,सचिव ॲड. समीर मखरे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापिका अनिता साळवे व वर्गशिक्षक सतीश कोल्हे त्यांच्यासह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

