shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या १० वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा*

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या १० वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा*

   इंदापूर प्रतिनिधी:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचा आज १० वी चा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' विद्यार्थ्यांनी १० वी च्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. कोरोना कालखंडानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवीत यशाचे शिखर गाठले आहे. विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या क्षेत्राचा विचार करून शिक्षण क्रमाची निवड करावी.विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
close