shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई एंटर प्रायजेस लकी ड्रॉ मध्ये फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा - केज पोलीसांचे आवाहन!!


--------------------------------------------------   

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 


स्वतःच्या फायद्यासाठी शिवजयंती निमित्त लक्की ड्रॉचे आयोजन करून चार चाकी वाहनासह इतर बक्षीसांचे आमिश दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी साई एंटर प्रायजेसच्या चार ठका विरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या प्रकरणात ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी केज पोलीस स्टेशन आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



केज येथे साई एंटर प्रायजेसच्या नावाने शिव जयंती निमित्त लकी ड्रॉ आयोजित करून ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी अमोल गालफाडे, राहुल शेवाळे, शिवराज मुथळे आणि राहुल औसेकर या चौघांच्या विरुद्धकेज पोलीस स्टेशन गु.र.नं. २३३/२०२२ भा. दं. वि. ४२०  आणि ३४ प्रमाणे दि. १० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

या गुन्ह्यातील फिर्यादी पत्रकार साजेद इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. की,आरोपीतांनी केज शहरात साई एंटरप्रायजेसच्या नावाने लकी ड्रॉ चे आयोजन करुन केज तालुका व बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यात देखील लकी ड्रॉ च्या नावाने मोठ मोठे बक्षिसांचे आमिष दाखवुन मोठ्या प्रमाणात प्रत्येकी १ हजार ५०० रु. किमती प्रमाणे कार्ड सामान्य जनतेस विक्री करुन व प्रत्यक्षात लकी ड्रॉ मधे दर्शविले गेलेले मोठे व मौल्यवान बक्षीस कोणासही न देता फसवणुक केली. 

सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलीस तपासात दिलेल्या फिर्यादीला दुजोरा मिळाला असुन या प्रेस नोटद्वारे पोलीसांनी सामान्य जनतेस आवाहन केले आहे की, ज्यांना कोणाला साई एंटरप्रायजेसच्या लकी ड्रॉ चे योजनेचे कार्ड कोणीही विक्री केले असतील अथवा सदर लकी ड्रॉच्या आधारे ज्यांची फसवणुक झाली असेल; अशांनी केज पोलीस स्टेशन येथे येवुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी साधावा. असे आवाहन करण्यात करण्यात आहे.

close