चंद्रपूर▪️ किरण घाटे▪️-
महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ मावळ तालुका पुणे आणि विश्वकर्मा महिला बचत गट मावळ तालुका यांच्या संयुक्तिक विद्यमाने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात पाचवडच्या जगविख्यात कवयित्री कुमारी अर्चना दिलीप सुतार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.हा कार्यक्रम रविवार दि.१२जूनला पार पडला .
अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचे (कार्यक्रमाचे )चौथे वर्ष होते. मावळ तालुक्यातील विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे कार्यकर्ते दरवर्षी सुतार समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शालेय साहित्य त्यांच्या परीने देण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच या महासंघाच्या वतीने महिला बचत गटाच्या माध्यमातूनही समाजासाठी हातभार लावला जातो. कोरोना काळातही या सुतार समाजाच्या महासंघाने समाजाला भरपूर मदत केली आहे.यंदाच्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना सुतार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. समाज भूषण विश्वनाथ बाळासाहेब गरुड यांनी कु. अर्चना सुतार ह्या सुतार समाजाच्या भूषण म्हणून त्यांचा सन्मानाने गौरव केला. आज केलेला सत्कार हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. हा सन्मान माझा नसून समाजाचा आहे जन्मापासून तर मृत्युपर्यंतचा माणसाचा प्रवास कसा समाजावर अवलंबून असतो. यावर अर्चना सुतार यांनी प्रकाशझोत टाकला. आपणांस समाजासाठी काहीतरी देणे असते . आपल्यात ती क्षमता निर्माण झाल्यावर आपण फुल ना फुलाची पाकळी का होईना समाजासाठी दिली पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातुन स्पष्ट केले. माणसाचे आयुष्य हे क्षणभंगुर आहे आणि तेही एकदाचे आहे अश्या आशयाची ईश्वरावर आधारित समाजाचे भाष्य करीत सामाजिक "आयुष्य Once more नाही" नावाची कविता गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थितीतांनी त्यांचे कवितेला उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला हनुमंतराव पांचाळ, सुरेखा गाडे, विकास कदम, समाजभूषण विश्वनाथ गरुड, सत्कारमूर्ती रवींद्र रायकर, आमदार मावळ सुनिल आप्पा शेळके, पोलिस निरीक्षक विजय भोसले, संस्थापक ज्ञान्नेश्वर भाऊ भालेराव, निमंत्रक अशोक आनंदे तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे गणपतराव गायकवाड, दिलीप आनंदे, आकाश पवार संतोष जांभूळकर, मनोज येवले, युवराज दाखले, विजय भोसले,दत्ताभाऊ सुतार, सुभाष सूर्यवंशी, मंगेश हिरे,गणेश खांडगे,विजय खातकर,श्रावण जाधव, राजेंद्र वाघ,कवयित्री अर्चना सुतार, सुरेखा मोरे, निकिता रायकर, सुधा भालेकर, पौर्णिमा सोनवणे, प्रतिभा भालेराव आदीं मान्यवर मंडळी उपस्थित होती.



