shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा. शरद पवार यांच्यामुळे महिलांना समाज्यामध्ये स्थान - जिल्हाअध्यक्षा भारतीताई शेवाळे

खा. शरद पवार यांच्यामुळे महिलांना समाज्यामध्ये स्थान - जिल्हाअध्यक्षा भारतीताई शेवाळे 

खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक इंदापूर येथे संपन्न.


इंदापूर प्रतिनिधी: खा. शरद पवार यांच्यामुळे महिलांना समाज्यामध्ये स्थान आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा भारतीताई शेवाळे यांनी संसदरत्न खा. सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस आढावा बैठक इंदापूर  शासकीय विश्रामगृह याठिकाणी दि.४ जून रोजी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना माहिती देताना आपले मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षा सौ वैशालीताई नागवडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ भारतीताई शेवाळे, यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली. यावेळी इंदापूर तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर, शहर अध्यक्षा उमा इंगोले, स्मिता पवार, उज्वला चौगुले, मिना ठोले, तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या बैठक प्रसंगी काही  महिलांना संघटनेचे नवनियुक्ततिचे पत्र देण्यात आले.

 खा. शरद पवार यांच्यामुळे महिलांना समाज्यामध्ये स्थान आहे, महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले असून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महिलांची गाव पातळीवर पद नियुक्ती करण्यात आली आहे, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज राहीला आहे आणि राहणार आहे अशी माहिती जिल्हाअध्यक्षा भारतीताई शेवाळे यांनी आढावा बैठकी दरम्यान दिली .
close