इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडीचा दहावीचा निकाल ९७.२९% तर माध्यमिक विद्यालय तावशीचा निकाल १०० % लागला.
संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी केले यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्रामध्ये इयत्ता दहावीचा निकाल आज लागला असून इंदापूर तालुकाग्राम विकास प्रतिष्ठान निमसाखर संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी इयत्ता दहावीचा निकाल ९७.२९% लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रांजली नंदकुमार पवार ९३.६०%, दुसरा क्रमांक पायल चंद्रकांत नवले ९०.८०%, तिसरा क्रमांक प्राजक्ता दशरथ कवडे ८७.८०% गुण मिळवले आहेत.
तसेच इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान निमसाखर संचलित माध्यमिक विद्यालय तावशी १० वीचा निकाल १०० %प्रथम क्रमांक धुमाल अंजली अशोक ९४.२०%,द्वितीय क्रमांक सांगडे साक्षी गोकुळ ८७.९०%,
तृतीय क्रमांक व्होरकाटे वैष्णवी सुभाष ८६.००% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

