shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री वर्धमान विद्यालयाचे तीन विद्यार्थी मंथन स्पर्धा परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत झळकले.

श्री वर्धमान विद्यालयाचे तीन विद्यार्थी मंथन स्पर्धा परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत झळकले.
इंदापूर प्रतिनिधी:मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाली. या स्पर्धा परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाली. सदर परीक्षेमध्ये श्री वर्धमान विद्यालयाचे इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता कुंभार हिने अथक परिश्रमाने २४२ गुण प्राप्त करून राज्य गुणवत्ता यादीत १९ वी व केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला
तर अर्चित पडतुरे २०० गुण प्राप्त करून राज्य गुणवत्ता यादीत ४० वा व केंद्रात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे तसेच इयत्ता सातवीची विद्यार्थिनी
कु.आकांक्षा पाटील हिने १६४ गुण प्राप्त करून राज्यात ५५ वी व केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सदर विद्यार्थ्यांना सुरज मोरे, देवराम प्रधान, लक्ष्मी सरगर, स्मिता मुसळे, मीनाज शेख यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, माणिक पिसे यांनी केले. तसेच भविष्यातील परीक्षेसाठी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
close