संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा दोन वर्षांनंतर पंढरपूरकडे प्रस्थान करीत असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहिलेला नाही - निवृत्ती महाराज चोपदार.
तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पंढरपूरहून देहूकडे निघालेल्या अश्वाचे बावडा येथे पूजन .
इंदापूर प्रतिनिधी: जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देवाच्या स्वारीच्या अश्वाचे बावडा (ता.इंदापूर) येथे सालाबाद प्रमाणे रविवारी ( दि.१२) स्वागत करण्यात आले. अश्व हा देहूला दि.२० रोजी सकाळी ७ वा. पोहचणार आहे. बाभुळगाव (ता. पाथरी, जि.परभणी) येथील विनायक नारायण रणेर यांच्या मालकीचा अश्व असून त्यांची ही चौथी पिढी आहे.
परभणी जिल्ह्यातून हा अश्व पंढरपूरला चालत दाखल झाल्यानंतर तेथून तो दि.११ जून रोजी माही दिंडीबरोबर देहू कडे प्रस्थान सोहळ्यासाठी निघालेला आहे. ह.भ.प.निवृत्ती महाराज चोपदार यांचे मार्गदर्शनाखाली पायी चालत चाललेल्या या दिंडीमध्ये सुमारे ५० वारकरी आहे. त्यांचा मुलगा ह.भ.प. नामदेव निवृत्ती गिराम हे तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार आहेत. बावडा येथे दिंडी सोहळा आलेनंतर घाडगे कुटुंबीयांनी अश्वाचे पूजन केले. तसेच जयवंत घाडगे यांनी नामदेव महाराज चोपदार यांचा सत्कार केला व वारकऱ्यांचे अल्पोपहार देऊन स्वागत केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा दोन वर्षांनंतर पंढरपूरकडे प्रस्थान करीत असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहिलेला नाही, त्यामुळे चालू वर्षी पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी अधिक असेल, असे याप्रसंगी निवृत्ती महाराज चोपदार यांनी सांगितले.

