वडापुरीतील अदित्य मानेचा झी मराठी च्या वतीने सन्मान .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील अदित्य माने या युवकाने छोट्या पडद्यावर झळकत
आपल्या घराबरोबर गावाचे व तालुक्याचे नाव कमवले.
अदित्य माने हा अभिनय आणि कला एडिटिंग मध्ये त्याची कला दाखवत असून नुकताच झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजींद या मालिकेचं शेवटच्या दिवसाचं चित्रीकरण झालं. त्यावेळी त्यांच्या कलेच्या सन्मानाची पावती म्हणून त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
सध्या तो स्टार प्रवाह वरील कोठारे व्हिजन म्हणजेच महेश कोठारे प्रस्तुत पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आपली कला दाखवत आहे.

