shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोनल मेश्रामच्या अपघाती मृत्यूने सारेच हळहळले !

    
◼️चंद्रपूर ◼️किरण घाटे ◼️ बल्हारपूर पोलिस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस शिपाई मोनल मेश्राम यांचा काल एका रस्ता अपघातात दुदैवी मृत्यू झाला. शुक्रवारला सायंकाळी आपली ड्युटी करून त्या बल्हारपूर वरुन  राजू-याला (आपल्या गावी )दुचाकीने जात होत्या.त्यांचे मागेहून येणा-या एका भरधाव ट्रकने त्यांचे दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यातच घटनास्थळी मोनालीची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मृत्यूची बातमी कानी पडताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.दरम्यान पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह सामाजिक संघटनेच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.



महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका माया ताई कोसरे (नागपूर) अधिवक्ता मेघा धोटे (राजूरा) संयोजिका प्रतिभा पोहनकर (चंद्रपूर) सुविद्या बांबोडे (चंद्रपूर)सरोज‌ हिवरे , स्मृती कांबळे,स्नेहा मडावी, मंथना नन्नावरे, अल्का सदावर्ते , कल्याणी सरोदे ,  सारीका खोब्रागडे, आदींनी मोनालीच्या निधानाबाबत दुखवटा व्यक्त केला आहे.
close