▪️चंद्रपूर▪️-किरण घाटे -▪️गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण व वाटप शेतजमीन खरेदी विक्री प्रकरण सातत्याने चंद्रपूर जिल्ह्यात गाजत असुन सदरहु प्रकरणा बाबत युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व याच पक्षाच्या पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिवांसह नागपूरचे विभागीय आयुक्त, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, बल्हारपूरचे महसूल उपविभागीय अधिकारी ,राजूरा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदार बल्हारपूर व पोलिस स्टेशन बल्लारपूर यांचे कडे लेखी स्वरुपात निवेदने सादर करून चौकशीची मागणी केली होती.
दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने बल्हारपूर तहसीलदार यांना दि.१जूनला पोलिस स्टेशन बल्हारपूर कडून एक लेखी पत्र देण्यात आले असुन त्यात बल्हारपूर साजाचे पटवारी रोहितसिंग चव्हाण यांना प्रकरणातील संपूर्ण रेकॉर्ड घेऊन चौकशी व बयानासाठी हजर करण्या बाबत नमुद करण्यात आले होते .त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले आहे. उपरोक्त प्रकरणा विषयी यूवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी प्रिया झांबरे यांनी पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे निवेदने सादर केली होती.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.◼️सदरहु प्रकरणात महसूल विभागाचे तहसीलदार संजय राईंचवार हे जरी चौकशी करीत असले तरी अद्याप या प्रकरणात कोणावर अद्याप कार्यवाही झाली नाही. हे मात्र तेवढेच खरे आहे!◼️सातत्याने या प्रकरणात तक्रारी वाढत गेल्याने बल्हारपूर उपविभागीय कार्यालयाच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती पाटील -सुर्यवंशी यांनी बल्हारपूरचे तलाठी रोहित सिंग यांचा तलाठी रेकॉर्ड चौकशी साठी आपल्या कार्यालयात बोलाविले असल्याचे समजते.या संपूर्ण प्रकरणात आपला दोष नसल्याचे पटवारी बुवा सांगत जरी असले तरी यात त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते.◼️सन १९९०मध्ये तलाठी रोहित सिंग चव्हाण हे बल्लारपुर तलाठी दप्तर मध्ये कार्यरत नसतांना त्यांच्या स्वाक्षरीचा एक नकाशा आहे.त्या नकाशातील स्वाक्षरी व हस्ताक्षर तपासणी साठी पाठविल्यास या संपूर्ण (सातबारा रेकॉर्ड खोडतोड )प्रकरणाचा उलगडा होण्यास बरीच मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ◼️वरिष्ठांकडे या प्रकरणात सातत्याने तक्रारी झाल्यामुळे आता ख-या अर्थाने या चौकशीला गती मिळाल्याची चर्चा बल्हारपूर नगरीसह चंद्रपूरात ऐकावयास मिळत आहे.

