श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी लिमिटेड शिर्डी. संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा.श्री.यादवराव माधवराव कोते पाटील यांचा आज वाढदिवस...
श्री यादवराव कोते पाटील वीस वर्षापासून कामगार सोसायटीचे संचालक आहेत. एकेकाळी संस्था तोट्यात असतांना संस्थेला जीवदान देत संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करतांना श्री रामराव शेळके पाटील यांचे कट्टर समर्थक व तालीमत तयार झालेले लढवय्ये कामगार नेते म्हणून कामगार आजही मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे पाहतात.
*सोसायटीच्या राजकारणात आपला माणूस म्हणून हक्काने कामगार व सभासद समस्या घेवून त्यांच्याकडे जातात तेही समस्या त्यंच्या परीने सोडवतातच हा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे.कामगारहितासाठी निर्णय घेताना कर्मचार्यांच्या अडी-अडचणी सोडवल्या कोरोना काळात त्यांनी संस्थेचे व्यवसाय बंद असतांनाही दर महिन्याच्या एक तारखेला सोसायटीच्या कामगारांना चेअरमन असतांना पगार केला. सोसायटी कामगारांना सोसायटी कर्ज मर्यादा एक लाखावरुन तीन लाख रुपये करतांना महत्त्वाची भुमिका बजावली.सेवा नियम स्केल दिले. सोसायटी कामगारांच्या गणवेशाबाबत धाडसी निर्णय घेतला .पगार वाढ रजा सुट्ट्या कामगाराची अनेक प्रश्न त्यांनी सोडवले व कर्मचारी बंधूंना अडीअडचणीला कोणतीही मदत लागली तर त्यांनी अर्ध्या रात्री कर्मचार्यांना मदत केली व इथून पुढे ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील असे मला खात्री आहे.*
*शिर्डी शहरातील शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन असतांना सभासदांना खते औषधै बी बियाणे तसेच संस्थेच्या हितासाठी शिर्डी साकुरी शिव 21 गुंठ्ठे जागा घेताना महत्वाची भुमिका बजावली आहे.*
*साईबाबा संस्थान कर्मचारी वर्ग व मित्रपरिवार व शिर्डी ग्रामस्थ यादवराव कोते पाटील यांना मानणारा आजही मोठा वर्ग शिर्डी शहरात आहे. साईबाबा त्यांना उदंड आयुष्य देवो यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो ही आमची कर्मचारी वर्गाकडून साईचरणी प्रार्थना....*
शब्दांकन- श्री शिवाजी सोमवशी
प्रसिद्धी - पत्रकार संजय महाजन

