केंद्रातील भाजपा सरकारला नुकतेच आठ वर्षे पूर्ण होत आहेत.आठ वर्षात देशातील राजकिय , सामाजिक, आर्थीक परिस्थिती परकीय राष्ट्रांशी असलेले संबंधाबरोबर देश भ्रष्टाचारमुक्त झाला. या देशाला भवितव्य दाखवणारा नेता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. भारतीय नागरिकांच्या बरोबरच इतर देशातील भारतीय नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या देशाचा विचार करणारा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा ज्यांचे "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" हा मोदी सरकारचा मंत्र, भारतीयांचे अस्मिता असणारे प्रश्न पासून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने काम सुरू केले.
मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले, कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात आले, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले, ३ कोटीहून अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना अंतर्गत मालकीचे घर देण्यात आले, ४१ कोटींहून अधिक लोकांचे पहिल्यांदा बँकेत जनधन खाती उघडण्यात आले
दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण, मोदीजीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली, जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द केले, दहशतवादी हल्ले कमी झाले, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण दिले. कोरोना काळात सर्व राज्यांना भरघोस मदत करून अवघ्या ९ महिन्यात २ स्वदेशी लस विकसीत केल्या. कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे.
जनधन योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, संसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्रधानमंत्री जन औषधी योजना, मेक इन इंडिया, किसान विकास पत्र, मृदा आरोग्य कार्ड योजना, डिजिटल इंडिया कौशल्य भारत, बेटी बचाव बेटी पढाओ योजना, मिशन इंद्रधनुष्य, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, दिनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना, श्रमेव जयते योजना, अटल मिशन फॉर कायाकल्प आणि शहरी परिवर्तन योजना, स्वदेश दर्शन योजना, तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक वृद्धी योजना, राष्ट्रीय वारसा विकास आणि संवर्धन योजना, उडान योजना, राष्ट्रीय बाल स्वच्छता मिशन, वन रँक वन पेन्शन योजना, स्मार्ट सिटी मिशन, सुवर्ण मुद्रीकरण योजना, स्टार्टअप योजना, स्टँडअप योजना, डिजीलॉकर निवासी भारतीयांना कागदपत्रे सुरक्षित वैयक्तिक इलेक्ट्रिक पध्दतीने ठेवण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली, एकात्मिक वीज विकास योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुवनं मिशन, सागरमाला प्रकल्प, उज्वल डिस्कॉम आश्वासन योजना, विकल्प योजना, राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉ र ट्रान्स्फरमिंग इंडिया, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, नमामी गंगे प्रकल्प, सेतू भारतम प्रकल्प, प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना, क्लीन माय कोच आधार बिल, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, उन्नत भारत अभियान टीवी मिशन योजना, राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना, गंगाजल वितरण योजना प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान, विद्यांजली योजना, ग्राम उदय से भारत उदय अभियान, रेल्वे प्रवास विमा योजना, स्मार्ट गंगा सिटी, विद्यालक्ष्मी कर्ज योजना, स्वयं प्रभा शाला अस्मिता योजना, राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना, प्रकाशाचा हक योजना, राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, उदय देश का आम नागरिक, डिजिटल ऊर्जा गंगा, सौर सुजला योजना, एक भारत श्रेष्ठ भारत, ग्रीन अर्बन ट्रान्सपोर्ट स्कीम, प्रधानमंत्री युवा योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना अश्या विविध योजना मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या काळात सगळ्या समाजातील घटकांचा शहरांच्या बरोबर ग्राम भागांचा, गरीब पासून मध्यमवर्गीयांचा शेतकरी मजुरा पासून वंचित पीडित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.
रखडलेल्या देशाच्या अस्मितेचा मुद्दा म्हणजे अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी चा वाद न्यायालयाने सोडवला, भव्य राम मंदिर उभे राहत असताना वाराणसी कॉरिडॉर मध्ये काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराची भव्यता वाढली भव्य राम मंदिर मोदींच्या कारकीर्दीत पूर्ण होत आहे. अल्पसंख्याक महिलांचा सन्मानासाठी तलाक विरोधी कायदा तयार झाला. एकूणच काय तर देश विकासाच्या दिशेने जात असताना सर्व समाजाचा विकास आणि समाजाची उन्नती होण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे.
लेखक:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर

