shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"या" वैद्यकीय डिग्रीचे करायचे तरी काय ?जिवती तालुक्यातील उमेदवारांचा प्रश्न, स्थानिकांना प्राधान्य द्या - आरोग्य मंत्र्यांकडे मागणी !


चंद्रपूर◼️किरण घाटे◼️
 महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांच्या हस्ते नुकतेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील नांदा, शेणगाव, विरूर स्टेशन व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे लोकार्पण पार पडले  या आरोग्य केंद्रासाठी करण्यात आलेली पदभरती ही योग्यरित्या व पारदर्शकपणे राबविण्यात आली नाही.स्थानिकांना यात कुठलेही प्राधान्य देण्यात आले नाही .या  सर्व नियुक्त्या  बाहेरच्या असल्याने त्या तात्काळ रद्द करण्यात यावे व नव्याने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अश्या आशयाची मागणी जिवती भागातील सामाजिक कार्यकर्त्या सिंधु राठोड यांनी राज्याचे  आरोग्य मंत्री व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिवती तहसीलदार यांचे मार्फत एका लेखी निवेदनातुन केली आहे.



◼️स्थानिक उमेदवारांना या भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाल्यामुळे संधी मिळेल अशी आशा होती. परंतु नियुक्त झालेले सर्व कर्मचारी उद्घाटनाच्या दिवशीच उपस्थित असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.  सदरहू पदभरती कधी व केव्हा झाली?हा एक प्रश्नच आहे. या बाबत कोणालाही कल्पना नाही.  वरील पदभरतीची स्थानिक पातळीवर देखिल जाहिरात  केली नसल्याचे बोलल्या जाते.  त्यामुळे स्थानिक पात्र युवक-युवतीं मध्ये नाराजीचे सुर उमटू लागले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये एकही स्थानिक उमेदवार नाही.हे विशेष ! जिवती तालुक्यातील एकही  उमेदवार पात्र नाही का? हा प्रश्न या निमित्ताने आता विचारल्या जात आहे. सीएससी संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली असल्याची चर्चा असुन  स्थानिक पातळीवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात न आल्याने पात्र उमेदवार या भरतीपासून वंचित राहिले आहे. पद भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याला जबाबदार असलेल्या सीएससी संस्थेवर कारवाई करून पदभरती रद्द करावी व नव्याने ही भरती करावी अशी  मागणी सिंधू राठोड यांचेसह या भागातील युवक युवतींनी आज केली आहे.मागणीची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधू राठोड यांनी दिला आहे.
close