shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर तालुक्यातील नदीवरील बंधारा पाण्याखाली; संपर्क तुटला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२

श्रीरामपूर तालुक्यातील नदीवरील बंधारा पाण्याखाली; संपर्क तुटला..!!

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रावर असलेला कमलपुर बंधारा पाण्याखाली गेल्याने दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी श्रीरामपूर बाजार समितीमध्ये येत असतात.मात्र कमलपूर बंधाऱ्यावर पुराचे पाणी आल्याने श्रीरामपूर -वैजापूर -गंगापूर या तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
         त्यामुळे नागरिकांनी देखील बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करू नये असे आवाहन श्रीरामपूर तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तसेच नदीकाठच्या नागरिकांनी देखील पाण्यामध्ये न जाण्याचे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे.
 
         नागरिकांनी देखील आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन श्रीरामपूरचे प्रांताधिकारी श्री.अनिल पवार, तहसीलदार श्री.प्रशांत पाटील ,पोलीस निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे यांनी केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close