shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भंडारदराही निम्मे भरले! गोदावरीला पुर ; नदीकाठच्या नागरिकांना अतीदक्षतेचे आदेश, नगर जिल्ह्यात तीन दिवस पावसाचे संकट..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२

भंडारदराही निम्मे भरले! गोदावरीला पुर ; नदीकाठच्या नागरिकांना अतीदक्षतेचे आदेश, नगर जिल्ह्यात तीन दिवस पावसाचे संकट..!!

भंडारदरा : पाणलोटात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने निळवंडे पाठोपाठ उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदराही आता निम्मे भरले आहे. अतिवृष्टी सुरू असल्याने काही ठिकाणी बांध फुटले. या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा रविवारी मध्यरात्री निम्म्यावर पोहचला होता. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सोमवारी दिवसभरात 164 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. सायंकाळी 4390 दलघफू (52.76टक्के) झाला होता. दिवसभरात 278 दलघफू नवीन पाणी दाखल झाल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 5295 दलघफू(47.96 टक्के) झाला आहे. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला होता. वाकी तलावाचा विसर्ग 1022 क्युसेक असून हे पाणी निळवंडेत जमा होत आहे.
प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. भंडारदरात रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर काल सोमवारी वाढला होता. पडणार्‍या पावसाची नोंद 87 मिमी झाली आहे. त्यामुळे कृष्णवंती नदी आणि ओढे नाले भरभरून वाहत आहेत. रतनवाडी घाटघर, साम्रद ही धुक्यात हरवलेली गावे असल्याचे दिसून आले. धो धो पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन पुरते गारठून गेले आहे. जनावरेही गारठून जात आहेत.

पावसाने जोर पकडल्याने डोंगर दर्‍यांमधून वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढेनानाल्यांना पूर आला असून धरणात विसावर आहे. त्यामुळे धरणाचे खाली गेलेले पोट आता फुगू लागले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close