shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईंच्या शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२

साईंच्या शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात..!!

शिर्डी : साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटेच्या काकड आरतीनंतर भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे गुरूपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट नसल्याने शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाची धामधूम बघायला मिळत आहे.
         साईबाबांना गुरू मानून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य साईभक्त साई चरणी नतमस्तक होत असतात. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने असंख्य साईभक्तांनी शिर्डीत हजेरी लावली आहे. साई संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त अमेरिका येथील दानशूर साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून साई मंदिरासह परिसरात आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रींची प्रतिमा पोथी व विण्याची मिरवणूक काढून गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. 

     गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देश- विदेशातून साईभक्त शिर्डीत येत असतात. साईबाबांची वेशभूषा साकारून साईभक्त पालखी घेऊन साईनगरीत दाखल झाले आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close