shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखील भारतीय समन्वीत फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीचे आयोजन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १३ जुलै २०२२

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखील भारतीय समन्वीत फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीचे आयोजन..!!

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखील भारतीय समन्वीत फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीचे आयोजन गोपाळपूर (खामगाव), ता. नेवासा, जि. अहमदनगर येथे करण्यात आले होते.
 या बैठकीमध्ये लिंबुवर्गीय फळपिक लागवड तंत्रज्ञान व किड आणि रोग व्यवस्थापन तसेच मोसंबी पिकाची लागवड या विषयी प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद पाचणकर व डॉ. सतिश जाधव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रणजीत कडू यांनी लिंबुवर्गीय फळपिकांमध्ये जैविक किडींचा वापर आणि मित्र किडींचे संगोपन या विषयी मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्रज्ञ प्रा. मधुकर शेटे यांनी मोसंबी पिकावरील रोगाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकर्यांच्या शेतावर शिवार फेरीचे आयोजन करुन शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण केले. 

यावेळी उपस्थित असलेल्या शेतकर्यांना फळपिके संशोधन प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या संशोधनात्मक शिफारशींची तांत्रिक माहिती त्याचबरोबर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
          या बैठकीसाठी गोपाळपूर पंचक्रोशीतील मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. साहेबराव ताठे यांनी शेतकरी व शास्त्रज्ञांचे आभार मानले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी कृषि विभागाचे कृषि सहाय्यक श्री. गायकवाड व श्री. फुलारी यांनी विशेष सहकार्य केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close