shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजच्या ज्ञानेश प्रवीण देशपांडेयाचे सीए परीक्षेत यश !!

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधि:-

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय ) वतीने घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटच्या ( सीए ) अंतिम परीक्षेत केज येथील ज्ञानेश प्रवीण देशपांडे यानी यश प्राप्त केले. 

 
वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे यांचा मुलगा ज्ञानेश प्रवीण देशपांडे 1 ते 4 मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे शिक्षण झाले त्यानंतर नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल मध्ये 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण झाले. 11 वी व 12 वी कॉमर्स सांगली येथील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथे 90 टक्के घेऊन उतीर्ण झाला. पुढे CA करण्याचा मानस असल्यामुळे पुणे येथे क्लास केले आणि सोबत गरवारे कॉलेज ला BCOM केले.
10 वी ला असताना मुंडे साहेबाची भेट झाली होती. स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी CA हो अस सांगितले होते त्यांच्या शब्द अंतिम धरून तो आज CA झाला.
वयाच्या 23 व्या वर्षी CA होण्यात त्याचे आजोबा भाऊसाहेब देशपांडे, आजी प्रमिला देशपांडे यांचा आशीवाद वडील प्रविण देशपांडे, आई शर्मिला देशपांडे, काका प्रशांत देशपांडे त्याचा भाऊ प्रथमेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.


केजकर परीवारातील पहिला चार्टर्ड अकौंटन्ट झालेल्या ज्ञानेश प्रविण देशपांडे याचा स्वामी समर्थ मंदिरात देशपांडे परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
close