अमोलराजे इंगळे हे सामाजिक कार्यात खूप सक्रिय - अंकिताताई पाटील ठाकरे.
कु. स्नेहा अमोलराजे इंगळे हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:ज्या गावात राहतो त्या गावातील ज्येष्ठांसाठी शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपणे हे कौतुकास्पद आहे. अमोलराजे इंगळे हे सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत. सामाजिक उपक्रम चांगल्या प्रकारे वेळोवेळी राबवत आहेत असे बाभूळगाव येथे कुमारी स्नेहा अमोलराजे इंगळे हिच्या १२व्या वाढदिवसानिमित्त बाभूळगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे यांनी (दि. २७ जुलै)केले त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील कु. स्नेहा अमोलराजे इंगळे हिच्या १२ व्या वाढदिवसाच्या निमित्त अनावश्यक इतर खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत भाजपचे युवा कार्यकर्ते व युवा उद्योजक अमोलराजे इंगळे व उद्योजक राजाभाऊ इंगळे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात १५० रुग्णांचे मोफत सर्व रोग निदान करण्यात आले व मोफत नेत्र तपासणी करून ६ रुग्णांचे डोळ्यावरचे मांस व तिरळेपणा याचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. तसेच २० रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अल्प दरात करण्यात येणार आहे. यामध्ये १३ गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले तर २० रुग्णांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात आले. तसेच हिमोग्लोबिन, थायरॉईड, शुगर, ब्लड प्रेशर तपासणी याची या शिबिरामध्ये करण्यात आली
यावेळी कुस्तीगीर संघाची सदस्य महेंद्र रेडके, उद्योजक राजेभाऊ इंगळे, ग्रा. पंचायत सदस्या सौ. संगीता राजाराम इंगळे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजस देवकाते, पोपट देवकर, विजय देवकर, राम आसबे, गिरी सर, गणेश पाटील, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस राजेंद्र पवार, दादा पांढरे, गणेश बागल, चिंतामणी गायकवाड, संतोष नरुटे, प्रा. पोपळे गुरुजी, सोमनाथ खानेवाले, अजित गायकवाड, बाभूळगाव उपसरपंच नागराज गुरगुडे, सोसायटीचे चेअरमन हनुमंत देवकर ,मा. सरपंच भारत यादव, ग्रा. सदस्य दादासो भोसले, संतोष बोंद्रे, राहुल भोसले, दादासो गुरगुडे, सुरेश कांबळे, अर्जुन चीतरे, डॉ. दत्तात्रय भोसले, श्रीमंत चव्हाण, महावीर आसबे, नारायण आसबे, अजित गायकवाड, मा. सरपंच गजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी अंकिताताई पाटील ठाकरे म्हणाल्या की ,वाढदिवस म्हणजे मौज मजा करून साजरा करणे असते. परंतु लहानपणापासून सामाजिक बांधिलकी चा आदर्श लहान मुलांच्या डोळ्यासमोर ठेवत वाढदिवस साजरा करणे, ज्या गावात राहतो त्या गावातील ज्येष्ठांसाठी शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपणे हे कौतुकास्पद आहे. अमोलराजे इंगळे हे सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत. सामाजिक उपक्रम चांगल्या प्रकारे वेळोवेळी राबवत आहेत. त्यांच्या अशा कार्यक्रमास मलाही बोलवत असतात. गावातील ज्येष्ठांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करते. या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना भेटून आनंद झाला.

