shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतंजली योग समिती युवा भारत इंदापूर यांचे वतीने गुरुपौर्णिमा साजरी...

पतंजली योग समिती युवा भारत इंदापूर  यांचे वतीने गुरुपौर्णिमा साजरी...
 इंदापूर प्रतिनिधी:  पतंजलि योग समिती व युवा भारत इंदापूर नगरपालिकेजवळील शाळा नंबर 1 व 2 येथील स्थायी योग वर्गामध्ये  गुरु पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आली. श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बालकृष्णजी यांचे चरणी नतमस्तक होऊन योगसाधना करण्यात आली. 
 पहाटेच्या भक्तिमय वातावरणात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी पवित्र श्रेष्ठ समजला जाणारा यज्ञ सामुहिक होम हवन मंत्रोच्चराच्यासोबत   करण्यात आला. होमनंतर सात्विक प्रसाद सर्वांना देण्यात आला.सर्व योगसाधकांनी नियमित योगसाधना करण्याची प्रतिज्ञाही यावेळी केली.
 महिला पतंजली योग समितीच्या प्रभारी सायरा आतार आणि सर्व भगिनींच्या वतीने  मल्हारी घाडगे, सचिन पवार शरद झोळ रविंद्र परबत,प्रशांत गिड्डे,चंद्रकांत देवकर,रामेश्वर साठे, सायरा आतार या योगशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक विद्यार्थी घडविले असे प्राचार्य भिमराव वणवे,राजेंद्र चव्हाण,काशिनाथ पारेकर ,तात्याराव वाघमारे यांचा ही सत्कार करण्यात आला.
  गुरुप्रती  समर्पण भावना म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यथाशक्ती गुरुदक्षिणा संकलित करण्यात आली.
   यावेळी मेघा भंडारी ,रेखा भंडारी,उज्वला घोगरे,मनिषा परबत,बोराताई   यांचेसह बहुसंख्येने योगसाधक उपस्थित होते.
close