शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२
धामोरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली..!!
राहुरी : तालुक्यातील धामोरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन सौ. लक्ष्मीबाई विठ्ठल वाडगे आणि व्हा. चेअरमन सौ. मीराबाई दिलीप कोकडे यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक कै. धोंडीभाऊ नारायण सोनवणे अर्थात सर्वांचे आवडते आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे 'भाऊ' यांनी घालून दिलेल्या आदर्श शिकवणीनुसार संस्थेचे कार्य सुरू आहे.
संस्थेला कर्ज वाटप करण्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री.अरुण बाबुराव तनपुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे; संस्थेचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात वसुलीस पात्र कर्ज १ कोटी २४ लाख ९५ हजार असून संस्थेने दिनांक २८ जून २०२२ अखेर संपूर्ण कर्ज फेड केले आहे. संस्थेने सभासदांना पीक कर्ज, पशुपालन कर्ज, संकरित गाई खरेदी कर्ज, ट्रॅक्टर खरेदी कर्ज, घराचे बांधकाम या आणि इतर अनेक विकास कामांकरिता अनेक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले आहे.
संस्थेचे संचालक श्री. नारायण (आबा) सोनवणे, रामनाथ सोनवणे, राजेश सोनवणे, विलास सोनवणे, संजय हरिश्चंद्रे, संभाजी कल्हापुरे, सुदाम कुसमुडे, भाऊसाहेब खेडेकर, अशोक पारखे, भाऊसाहेब जाधव, नानासाहेब खेडेकर, देवराम खेडेकर, यांचे वेळोवेळी सहकार्य लाभलेले आहे.
तर वसुलीसाठी संस्थेचे सचिव संजय शेळके, अहमदनगर जिल्हा बँकेचे विकास अधिकारी एम.डी. तनपुरे, वसुली अधिकारी मंडलिक साहेब, बँक इन्स्पेक्टर अरुण पटारे, शाखाधिकारी एन.डि. कुराडे, कॅशियर सत्रे साहेब खडांबे बू!! शाखा यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले असून संस्थेच्या शंभर टक्के वसुली बद्दल सभासदांनी संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव यांचे अभिनंदन केले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

