शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२
संगमनेर : मुळा नदीला पूर ; दूथडी भरून वाहू लागली..!!
संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील मुळा नदी गेल्या दोन दिवसांपासून होत असणार्या संततधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अकोले तालुक्यातील हरीचंद्र गड परीसरात मुळा नदीच्या उगम होत असून हरीचंद्र गड परीसरात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडल्याने अकोले तालुक्यात उगम पावणारी मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
सोमवारी या नदीला पूर आल्याने पठार भागातील कोठे, आंबीखालसा, घारगाव, अकलापूर, मांडवे, साकूर परिसरातून जाणारी ही नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहत होती. घारगांव परीसरातील ब्रिटिश काळातील पुल पाण्याखाली गेला आहे. पठार भागाला मुळा नदी ही नवसंजीवनी असून मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परीसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव परीसरातील मुळा नदीच्या पुलावर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून दुचाकी स्वारांना जा ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे महामार्ग प्रशासनाने या पाण्याची सोय करावी.अशी मागणीही वाहन चालकांमधून होत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

