कळस बु येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या महाराष्ट्र शासन पुरस्कृत योजने अंतर्गत पंचायत समिती अकोले मार्फत वर्धिनी टीमच्या माध्यमातून वीस महिलांचे स्वयंसहायता गट स्थापना करण्यात आले.
कळस येथील सुभाष पुरी महाराज सभागृहात आमसभा सरपंच राजेंद्र गवांदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, कुंदन कोरडे, प्रभाग समन्वयक श्री.कुलदीप पाटील उपस्थित होते.
महिलांचे संघटन करून महिलांची संस्था बांधणी म्हणजेच बचतगट करणे त्यांना प्रशिक्षण देणे यासाठी वर्धिनी फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. स्वयंसहायता गट स्थापना या पंधरवडा कालावधीमध्ये वीस नवीन महिला स्वयंसहायता गटांची स्थापना करून जवळपास 250 कुटुंबांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना उमेद अभियाना मार्फत स्वयंसहाय्यता गटा बाबत प्रशिक्षण देण्यात आले यादरम्यान आयोजित केलेली. यावेळी 20 गटांमधील जवळपास 200 महिला उपस्थित होत्या. वर्धा येथून आलेल्या वर्धिनी ताईंचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांना उमेद अभियाना विषयी तसेच शासनाच्या विविध योजना बाबत माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री जीवनज्योति व सामाजिक सुरक्षा विमा योजना याबाबत माहिती देण्यात आली. उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांनी एका विचाराने पुढे येऊन विविध सामाजिक उपक्रम मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे
त्याचबरोबर स्वतःचे उद्योग व्यवसाय निर्मिती करून महिलांनी सक्षमपणे आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री सोमनाथ गुंजाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी संघटन होऊन चांगल्या पद्धतीचे व्यवसाय उभारण्यावर भर देऊन उद्योजक झाले पाहिजे व स्वतः चे आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्या कुटुंबा चा विकास होऊ शकेल यासाठी या उमेद अभियानाची सहभाग घेतला पाहिजे. यावेळी ग्रामसेवक श्री कचरू भोर यांनी आभार मानले.

