शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२
शिंदे भाजपचे सरकार हे अल्पकाळ टिकणार - माजी मंत्री प्राजक्त तनपुरे..!!
राहुरी : राष्ट्रवादीकाँगेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती की, सध्याचे सरकार हे जास्त दिवस टिकणार नाही आणि ते फक्त वेळ वाया घालून जनतेची दिशाभूल करत आहे. शिदे भाजपचे सरकार टिकणार नाही अन आम्ही पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार आहोत, अशी माहिती दिली. दोन मंत्र्याचे सरकार हे जास्त काळ चालणार नसून आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत असा गौप्यस्फोट महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी केला आहे.
माजी राज्य मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी मंत्री पदाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मतदार संघात भरपूर विकासाची कामे केली आहे. विकासाची कामे करतानी त्यांनी कधीच राजकीय भेदभाव,जाती पातीचा भेदभाव केला नाही ,कुठल्या प्रकारचे काम असो ते प्राजक्त दादा तनपुरे हे योग्य पाठपुरावा करून पुर्ण करीत होते आणि करीत राहतील असे स्पष्ट केले. प्राजक्त दादाच्या मंजुरी दिलेल्या कामांचा ते आजही सत्तेत नसताना सुद्धा राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करताना दिसत आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. म्हणूनच आता मामा भाचे सुरात सुर मिळवून आपल्या कामाच्या ,जनतेच्या प्रेमाखातीर जनसेवेसाठी आम्ही पुन्हा येणार असा गौप्यस्फोट केला आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

