shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करा अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष- रवींद्र मोरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२

शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करा अन्यथा  स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष- रवींद्र मोरे..!!

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारला दिला आहे.


      सविस्तर वृत्त असे की अतिवृष्टीने खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकरी कसे तरी दिवस काढत असून बळीराजाच्या जीवावर जे राज्य चालतं त्या बळीराजाचे असे हाल बघून नुसते नावाला देश आणि राज्य कृषीप्रधान आहे शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात असताना सरकारचे कर्तव्य आहे की शेतकऱ्याला आधार देणे मात्र मागील सरकारनेही बळीराजाच्या तोंडाला कात चुना टाकून शेतकऱ्यांची मजा घेतली आता या नव्या सरकारने तातडीने एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी नाहीतर पुढील परिणामाला सामोरे जा.
अहमदनगर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतनिधीला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे देणे घेणे नसून एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलायला तयार नाही अशा निर्लज्य लोकप्रतिनिधींचा मी निषेध करतो येणाऱ्या काळात एकाही लोकप्रतिनिधीला रस्त्यावर फिरू देणार नाही स्वाभिमानी स्टाईलने लोकप्रिनिधींना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही
अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटना-जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे.


     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हे संपूर्ण राज्यांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उग्र क्रांतीचे जनक आहेत हे सर्वश्रुत आहे रवींद्र मोरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस कांदा दूध या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला घाम फोडला होता. रवींद्र मोरे यांच्या आंदोलनाची दखल प्रशासन स्तरावर नाहीतर राज्यस्तरावर घ्यावीच लागती त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सरकारला प्रथम स्वरूपाचा इशारा देताना म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न बघता लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करून बळीराजाला दिलासा द्यावा नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून उग्र क्रांती घडवून आणेन असे रवींद्र मोरे यांनी सरकारला इशारा देताना पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600









close