मुग सोयाबिन फुलतोय,
चारा झोकात डूलतोय !
मका ही होऊन ताठ,
पावसाची पहातोय वाट!!
स्वयंघोषित जल तज्ञांची,
मिटवली त्याने खाज!
यंदा भरपूर पावसाचे,
खोटे ठरलेअंदाज!!
कितीही वापरा यंत्रणा,
ठेवा लक्ष अष्टो प्रहरी!
वाड वडिलांनी सांगून ठेवलंय,
निसर्ग आहे लहरी!!
शास्त्रज्ञ समजती बाप स्वत:ला,
पण तो तर आहे आजा!
आपण पामर असह्य बापुडे,
आणि निसर्ग आहे राजा!!
*राजेंद्र नारायणे*
३०/०८/२२

