shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आय.टि .सी या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये आडसूळ संकुलाच्या १३९ विद्यार्थ्यांची निवड


प्रतिनिधी : आसावरी वायकर

चास: ३१ / नगर तालुक्यातील चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अंतर्गत आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये १८ ऑगस्ट २०२२ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 ह्या मेळाव्यात विविध ५८ नामंकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. आय.टि .सी  या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीने आडसूळ तसेच विविध शैक्षणिक संस्थेतून आलेल्या १३९ विद्यार्थ्यांना २.७८ लाख प्रति वर्ष नोकरीची संधी दिली विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल व कॉम्युनिकेशन ह्या मूलभूत बाबीवर निवड करण्यात आली.

 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सर्वांगीण विकास हाच मानस ठेवून आडसूळ शैक्षणिक संकुलाचे काम चालते,असे प्राचार्य डॉ. प्रदीप एम.पाटील सर अभिनंदन पर म्हणाले. एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.सुहास पाखरे, इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर, संगणक विभागप्रमुख डॉ.साजिद खान, डॉ.विश्वजित कांबळे, डॉ.धन्यकुमार जैन, डॉ.हेमंत जाधव, यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.अनिरुद्ध आडसूळ, उपाध्यक्ष मा.श्री.विश्वनाथ आडसूळ आणि सचिव मा.सौ.लीना आडसूळ यांनी शुभेच्छा दिल्या.
close