shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सत्य हे कडवट असते... सत्याला न्याय देणार काय?


*पांढरपेशी गुन्हेगारी वर मंत्री कारवाई करणार काय?
कोरोनाच्या काळात हॉस्पीटल ने आव्वाचे सव्वा बीले घेतलीत..
*गुन्हे दाखल होणार काय?
रेम्डीसिव्हिर, च्या काळ्या बाजारात गुंतलेले आडून पैसे घेत होते..
*गुन्हे दाखल होणार काय
मेडीकल च्या विद्यार्थ्यांना भरमसाठ डोनेशन द्यावे लागतात..

*गुन्हे दाखल होणार काय?
पाच रुपयांची पालकची जुडी पण शिर्डी त एक प्लेट शंभर ला..
*गुन्हे दाखल होणार काय?
गर्दीच्या काळात हॉटेल  ५०० ची रूम  ५००० ला 
*गुन्हे दाखल होणार काय?
तरुण तरुणींना तासासाठी हॉटेल देऊन पिढी बरबादीचा धंदा करतात
*गुन्हे दाखल होणार काय?
अनेक हॉटेल मध्ये प्रतिष्ठीतांचे जुगार चालतात..
*गुन्हे दाखल होणार काय
शिर्डी त आलेल्या परराज्यातील भक्तांना रस्त्यावर अडवून शासनाचे कर्मचारी पठाणी वसूली करतात..
*गुन्हे दाखल होणार काय?
शिर्डीत आरक्षण टाकून ते काढण्यासाठी व्यवहार करतात..
*गुन्हे दाखल होणार काय?
एकच प्लॉट अनेक जणांना विकले जातात.. साई भक्तांना फसवल्याच्या अनेक घटना
*गुन्हे दाखल होणार काय?
रस्त्यावर दर्शन रांग टाकून शासनाचे रस्ते  बळकावले
*गुन्हे दाखल होणार काय?
गाळे मालक, दुकानदार दारा पुढे रस्त्यावर पाटी घेऊन बसणाऱ्या गरिब व्यावसायिक कडून हजार रुपये रोज घेतात
*गुन्हे दाखल होणार काय?
बायपास चेकपोस्ट वरून एक गाडी सोडायचा दर रुपये ५०० आहे
*गुन्हे दाखल होणार काय?
कालव्यांचे पाणी शेतकऱ्यांना राजरोसपणे पाचशे ते हजार रूपये एकराने विकतात
*गुन्हे दाखल होणार काय?
कालव्यात डोंगळा टाकायचा व राजरोसपणे शासनाला लुटायचं... त्याचा दर पाच हजार रुपये.
*गुन्हे दाखल होणार काय?
शेतकरी कांदा एक रुपये किलो देतो आणि व्यावसायिक तोच कांदा वीस रूपये किलो विकतो
*गुन्हे दाखल होणार काय?
आमदार, खासदार, मंत्री यांची संपत्ती अमाप वाढते.. ठेकेदार आरोप करतात खूप कमीशन मागतात.. काम अर्धवटच सोडून जातात..
*गुन्हे दाखल होणार काय?
होय शिर्डीतील तरुणांचा मार्ग चुकला असेल.. पण केवळ धनदांडग्यांचे हित जपण्यासाठी किंवा संस्थान मध्यें हार फुल विकण्याचा व्यवसाय एखाद्या बगलबच्च्यांना देण्यासाठी..
*गोरगरीब जनतेच्या प्रपंचावर नांगर फिरवून त्यांना देशोधडीला लावून त्यांना गुन्हेगारी कडे ढकलू नये.. पॉलिसी च्या व्यवसायात सगळेच गुन्हेगार नाहीत..  सत्ता तुमच्या कडेच ठेवा पण गरिबांचे प्रपंच शाबूत ठेवा..
शिर्डी त वाढलेली पांढरपेशी गुन्हेगारी पहिली मोडून काढा.. पहिले गुन्हे त्यांच्यावर दाखल करा..

सामाजिक कार्यकर्ते
संजय भास्करराव काळे
close