shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पीएम किसानच्या ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना ३१डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेची पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलबजावणी कक्षाकडे निवेदनाद्वारे मागणी...

संगमनेर । प्रतिनिधी :-
केंद्र सरकारकडून २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार (चार महिन्याला २०००/-) देण्यात येत आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यालयाकडून देण्यात आलेली ई-केवायसी साठी ची मुदत ३१/०८/२०२२ होती,  पण सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयाकडून देण्यात आलेली केवायसी साठी ची मुदत यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पना नाही तसेच काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक तसेच हाताचे ठसे देखील अपडेटेड नाहीत. त्याचप्रमाणे बँक खात्याला आधार लिंक नाही त्यामुळे सदरचा निधी शेतकऱ्याला मिळण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर पीएम किसान ई -केवायसी योजनेसाठी असलेली ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे शक्य झाले नाही त्यामुळे सदर मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत करावी म्हणजे सदर योजनेतून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही तरी सदर निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन मुदतवाढ मिळावी, अशा आशयाचे निवेदन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेने पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलबजावणी कक्षाकडे तसेच १)मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब,पंतप्रधान, भारत सरकार
२)मा.श्री.नरेंद्र सिंहजी तोमर,साहेब,कृषिमंत्री, भारत सरकार
3)मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
4)मा.श्री.अब्दुल सत्तार साहेब,कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांचेकडे केली आहे.
सदर पिएम किसान ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भावना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी व्यक्त केली.
close