shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृत महोत्सव दिना निमित्त "मी श्रीरामपूर नगरपालिका बोलते आहे "

( भाग पहिला)

कर्मचाऱ्यांनी सेवा केली,
अधिकाऱ्यांनी पुरवले लाड!
जन्मदाते उपाध्ये महाराज,
गेले कधीच पडद्याआड!!

माझ्या जीवावरती कुणी,
राजकीय स्वप्न पाहिले!
तर कुणी माझ्यासाठी,
तन,मन,धन ही वाहिले!!

सुख असो वा दुःख मी,
 निमूटपणे साहिले!
आनंद झाला किंवाअन्याय,
सदैव गप्पच राहिले!!

आज मात्र मनाचे काही,
दरवाजे मी खोलते आहे!
होय मी तुमची श्रीरामपूर ची,
नगरपालिका बोलते आहे!!

मला अभिमान आहे सेवक,
सत्ताधारी झाले!
सुख ऐश्वर्य भोगले,
सदस्य,अध्यक्ष झाले!!

टेकावडे आणि ससाणेंशी
विशेष माझा लगाव!
स्वच्छता आणि वैभव,
त्यात पाणी साठवण तलाव!!

कंत्राटदाराचे गोठीव पैसे,
कुणी ढिले केले!
गटारीचे घाण विषय,
थेट वरती गेले!!

कंत्राटी कामगार कायम नाहीत,
हे दुःख मात्र सलते आहे!
होय मी आपल्या श्रीरामपूर ची,
नगरपालिका च बोलते आहे!!

कुणी आले जनतेतून,
कुणी स्वार्था साठी लादले!
राजकीय शक्तींच्या इशाऱ्यावर,
 बदलावे लागले दादले!!

कधी होते मी रुपसुंदरी,
सोने नंबरी शंभर!
पिंपरी चिंचवड पाठोपाठ होता,
राज्यात दुसरा नंबर!!

सत्ता -पैसा हव्यासाचे,
नेत्यांचे न्यारे रस्ते!
आनंद आहे अमृत महोत्सव,
अधिकाऱ्यांचे हस्ते!!

प्रांत साहेब नि मुख्याधिकारी,
मजवर प्रेम त्यांचे भलते आहे!
७५वर्षांची झालेय आज,
मी नगरपालिका बोलते आहे!!

      (राजेंद्र नारायणे)
  दिनांक ०१/०९/२०२२
(भाग दुसरा लवकरच🙏)
close