shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवोदित पत्रकार,संपादकांचे मार्गदर्शक,ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने......!


आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! माझ्या एकट्याच्याच नव्हे, तर तुम्हाला मानणाऱ्या राज्यातील हजारो पत्रकारांच्या शुभेच्छा !

            सन्माननीय शौकत भाई शेख

तुमची कर्तबगारी तुम्हाला यापुढे अधिक यश मिळवून देईल,असा विश्वास महाराष्ट्रातील नवोदित संपादक व पत्रकारांना निश्चितपणे आहे. वाढदिवस हे निमित्त आहे. या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतोच. पण या शुभेच्छा एका दिवसापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या वर्षाच्या ३६५ दिवसांकरिता आहेत.तुम्ही आम्हा तरुण संपादक व पत्रकारांचे मार्गदर्शक आहात. एकीकडे तुमच्यासारखे आदर्श नेतृत्व आणि दुसरीकडे तुमच्या कामाच्या झपाट्याने भारावलेले आम्ही सगळे पत्रकार. त्यातूनच एक शक्ती आपोआप निर्माण होत आहे. तुमचे नेतृत्व माझ्यासारख्यांना भावले, याची कारणे अतिशय वेगळी आहेत. अगदी मोकळेपणाने सांगतो. समाजाच्या आणि संपादक व पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वत:ला झोकून दिलेत. अविरत काम करण्याची तुमची धमक हे तुमचे विलक्षण सामर्थ्य आहे. मेहनत आणि जिद्द तुमच्याकडून शिकावी.राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे नेतृत्व तुम्ही करत आहात आणि लवकरच देशातील संपादक व पत्रकारांचे नेतृत्वही तुम्ही कराल, ही काही आता काल्पनिक गोष्ट राहिलेली नाही. संघटनेच्या माध्यमातून संपादक व पत्रकारांना मोठी शक्ती तुम्ही देत आहात. 


पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीची तुमची तळमळ तुमच्या प्रत्येक दिवशी आम्हाला जाणवते आहे. तुम्ही स्वतःपुरते कधीच पाहिले नाही. प्रत्येक विषयात आपले पत्रकार बांधव कसे उभे राहतील ? , त्यांना विविध सुविधा कशा निर्माण होतील ? याचा विचार तुम्ही नेहमी करता आणि हेच तुमचे मोठेपण भावले आहे. आज समाजात स्वतः खेरीज दुसऱ्याचा विचार करणारी माणसे फार कमी आहेत. स्पष्ट बोलणारी आणि निर्भीडपणे मत मांडणारी तुमच्यासारखी माणसे ही समाजाची गरज आहे. तुमच्या स्वभावामध्ये स्पष्टपणाचे एक सुंदर मिश्रण झाले आहे. कोणाला ते आवडेल, कोणाला आवडणार नाही,पण तुमच्या कोणत्याही कामात बघतो, पाहतो हे शब्द तुमच्या कोषात नाहीत. काम करायचे म्हणजे तुम्ही करून टाकता. तुमच्या स्वभावात स्वच्छता, स्पष्टता आणि पारदर्शकता जाणवणारी आहे. तुमच्यापासून माझ्यासारखी लहान माणसे जे काही शिकले, ते हेच शिकले आहे की, काम करताना स्पष्टता ठेवा. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संपादक व पत्रकारांची बांधणी करण्याचे काम आपण करत आहात, त्यामुळे तुमची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे. हे तुमच्या कामाच्या तडफेमुळे दिसते आहे.


राज्यातील ग्रामीण व शहरी भागात संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला व वृत्तपत्राशी संबंधीत प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी स्वाभिमानी संपादक सेवा संघाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे.तसेच संपादक व पत्रकारांसाठी 'बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना शासनाने जाहीर केली यासाठी देखील आपल्या संपादक संघाच्यावतीने अनेकोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे,हे यश म्हणजे पत्रकारांच्या अनेक संघटने सोबतच स्वाभिमानी संपादक सेवा संघाने केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश हे सर्व पत्रकारांच्या संघटनेच्या परिश्रमाचे यश आहे.
राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी संपादक सेवा संघाशी जोडले गेले आहेत. राज्यातील मुंबई,कोंकण,विदर्भ, मराठवाडा,नागपूर,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, आदी भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून पत्रकार संरक्षण कायद्यासाठी देखील शासन दरबारी वेळोवेळी लढा दिलेला आहे,तसेच स्वाभिमानी संपादक सेवा संघाचा विस्तार विविध भागात करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहेत.सभासदांना संघटनेमार्फत शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोलनाके,सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा ठेवण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहात. अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य दिले जाते, त्यामुळे ग्रामीण भागातील संपादक व पत्रकारांवर अन्याय होतो .त्यामुळे ग्रामिण भागातील संपादक व पत्रकारांनाही या सवलती मिळाव्यात अशी आपली भूमिका असुन त्यासाठी आपण प्रयत्नशिल आहात तसेच संघटनेमार्फत विभागनिहाय अधिवेशने,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव व पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम संपादक संघाच्या माध्यमातून सुरु आहे.

राज्यातील पूर परिस्थिती आणि गत दोन वर्षापासून सुरु असलेली कोरोना महामारी यातही आपण आणि संघाने मदतीचा हात पुढे करुन पत्रकारांना करफ्यू पास बाबत शासन दरबारी संघर्ष केला आहे,महत्वाचे म्हणजे नवोदित संपादकांना वर्तमानपत्र शिर्षक मंजुरीपासुन रजिस्ट्रेशन आणि वर्तमानपत्राचे सातत्य टिकवत शासकीय लिस्टमध्ये समाविष्ट करुन शासकीय जाहीराती, अधिस्वीकृती मिळवून कसे अधिकृत शासनमान्य पत्रकार होता येऊ शकेल याचे वेळोवेळी महत्वाचे मार्गदर्शन आपल्याकडून मिळत असल्याने अनेक दैनिक, साप्ताहिक वर्तमानपत्र आज नियमितपणाने प्रकाशित होऊन शासकीय सवलती मिळविण्यास पात्र ठरले आहेत, अशीच आपल्या कडून राज्यातील संपादक व पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे हिच आपेक्षा आहे, आपल्या वाढदिवसानिमित्त पुनश्च हार्दिक शुभेच्छा 💐

शब्दांकन :  पत्रकार सोमनाथ जानराव
संपादक: साप्ता.पूर्वकल्पना, श्रीरामपूर
close