भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान साजरा करताना भारतीय संहितेनूसार राष्ट्रध्वजाचा मान राखावा - सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रतिलाल चौधर.
विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजासह हर घर तिरंगाच्या घोषणेसह कळंब परिसरात प्रभातफेरीव्दारे केली जनजागृती .
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान साजरा करताना भारतीय संहितेनूसार राष्ट्रध्वजाचा मान राखावा वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंब येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसह उपस्थितांना आव्हान केले. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजासह हर घर तिरंगाच्या घोषणेसह कळंब परिसरात प्रभातफेरीव्दारे जनजागृती केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेसह क्रांतिकारकांच्या प.रतिमेचे पूजन करून वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंब येथील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मान्यवरांसह तिरंगा ध्वजासह कळंब परिसरात प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा जनजागृती करून ग्रामस्थांना आपल्या घरावरती तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.प्रभातफेरीमध्ये वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधर , खाडे ,कळंब ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष मधुकर पाटील, सचिव सुर्यभान मोहिते,कळंब गावच्या प्रथम नागरिक, सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मेटकरी, राजेंद्र डोंबाळे, प्रमोद खंडागळे,विद्यालयाचे प्राचार्य बी.के.सर्वगोड सर, पर्यवेक्षक राजेंद्र माळवदकर सर, ज्यूनिअर विभाग प्रमुख सचिन सावंत सर यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले.
यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात मार्गदर्शन करताना विद्यालयाचे अध्यक्ष रामचंद्र कदम यांनी हर हर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधर यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर हर तिरंगा अभियान राबवत असताना विद्यार्थ्यांनी भारतीय संहितेनूसार राष्ट्रध्वजाचा मान राखावा तसेच कळंब परिसरातील नागरिकांनाही या अभियानाव्दारे जागृत करण्याचे आवाहन केले.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतिलाल चौधर यांनी खाऊ वाटप केले.

