shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरात भिमाई आश्रमशाळा व डॉ. कदम गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन उत्साहात साजरा*.

*इंदापूरात भिमाई आश्रमशाळा व डॉ. कदम गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन उत्साहात साजरा*.
*इंदापूर*प्रतिनिधी :- ( *दि.११*) राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट,उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या  भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल मनोकामना असते. असे गौरोद्गार उपप्राचार्य सविता गोफणे यांनी काढले.
 मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह इंदापूर व डॉ. कदम गुरुकुल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण उत्साहपूर्व वातावरणात साजरा झाला. त्यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे बोलत होत्या.
यावेळी डॉ. कदम गुरुकुल व भिमाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी  मुलांना औक्षण करून राख्या बांधल्या. तसेच कॅटबरी, मिठाई, चॉकलेट व लाडू देत विद्यार्थीनींनी मुलांचे तोंड गोड केले. तसेच मुलांनी मुलींना ओवाळणी म्हणून पेन दिले.
प्रा. रेश्मा झेंडे म्हणाल्या की, रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
यावेळी गुरुकुलचे रवींद्र नागटिळक म्हणाले की, डॉ.कदम गुरुकुलचे अध्यक्ष डॉ.एल.एस. कदम,डॉ. सविता कदम व मुख्याध्यापिका वृंदा जोशी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन हा उत्सव आश्रमशाळेत साजरा केला.यावेळी श्रीराम कवितके, जया सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ.कदम गुरुकुलच्या अध्यापकांचा गुलाबपुष्प देऊन भिमाई आश्रमशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी),सचिव ॲड. समीर मखरे यांनी सर्वांना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा देऊन यावेळी कार्यक्रमाचे कौतुक केले. 
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार  यांनी मानले.
यावेळी कार्यक्रम प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 
यावेळी डॉ.कदम गुरुकुलचे अध्यापक सोमनाथ नलवडे, सुयोग कापसे, सतीश साठे,अतुलकुमार सिंग तसेच आश्रमशाळेचे प्राध्यापक,शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close