shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी वतीने हर घर तिरंगा योजनेची जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन.

श्रीनाथ विद्यालय वडापुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी वतीने हर घर तिरंगा योजनेची जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने श्रीनाथ विद्यालय वडापुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी यांच्या वतीने वडापुरी या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीच्या माध्यमातून हर घर तिरंगा या योजनेची जनजागृती करण्यात आली. यामध्ये  सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ढोल पथक, ध्वज आणि घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली .
या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातर्फे मुख्याध्यापक श्री तपासे सर तसेच इतर सहकारी शिक्षक श्री खताळ सर, पासगे सर आणि शिक्षिका शिर्के मॅडम, पवार मॅडम, थोरात मॅडम यांनी केले. शिक्षकेतर कर्मचारी शिर्के सर आणि मदने यांनी नियोजनामध्ये मदत केली.
तर 
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापका रजिया शेख मॅडम, सहशिक्षिका मोरे मॅडम, खाडे मॅडम, सहशिक्षक माने सर यांनी नियोजन केले.
close