shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित .

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित .

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील यशस्वी गावांना पुरस्कार.


इंदापूर प्रतिनिधी:राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंअंतर्गत  सपकळवाडी, ता. इंदापूर आणि माण, ता. मुळशी  या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोव्हीड हेल्पलाईन पथक आदींच्या माध्यमातून या गावांनी उत्कृष्ट काम केले आहे.

महाराष्ट् शासन ग्रामविकास विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे कोविड १९ व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्तगांव योजना जिल्हास्थरिय प्रथम पुरस्कारने ५० लाख रुपये बक्षीस देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते  पुणे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषद सि.ओ आयुष प्रसाद, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच सचिन  सपकळ सरपंच रोहिणीताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला सपकळ, अश्विनी सपकळ, सारिका पवार, ज्ञानेश्वर गाडगे, पोलीस पाटील सुनिता सपकळ., शिवाजी बापू सपकळ, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद सपकळ, उपाध्यक्ष महादेव सपकळ, अनिल सपकाळ , तुषार सपकळ, पृथ्वीराज  सपकळ,  सुंदर सपकळ ,धनंजय सपकळ, शैलेश सपकळ ,सुनील भुजबळ, सुदर्शन भुजबळ, शिवानी सपकळ, कुंदन सपकळ ,तानाजी सोनवणे, केशव अभंगराव, सचिन वाघमारे ,ग्रामसेवक अरुण जाधव, डॉक्टर कुगने ,पद्माकर धर्माधिकारी, अभिजीत सपकळ ,सचिन वाघमारे ,तानाजी सावंत उपस्थित होते.

close