गेल्या तीस वर्षांत काय कमावले काय गमावले याचा लेखाजोखा करणे महत्वाचे आहे.
सर्वात प्रथम शुभेच्छा देण्यासाठी शेकडो फोन आलेत त्यातील 100 हुन अधिक फोन जाणून बुजून स्वीकारले नाहीत. जे मंडळी वर्षभर व्यवसयात आणि सामाजिक विषयात टाळत आलेत अश्या हितचिंतकांच्या वांझोट्या शुभेच्छाही नकोत ही भूमिका आता ठरवून घेतली आहे त्यामुळे कुणाची क्षमा मागण्याचा संबंधच नाही. बाकी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार
तीस वर्षातील तब्बल 22 वर्ष शैक्षणिक राहिले आणि जो काही सामाजिक, व्यवसायिक प्रपंच आहे तो केवळ आठ दहा वर्षांचा, मराठा आरक्षण, अट्रॉसिटीच्या गैरवापराचा लढा, बातमीदारी करतांना या काळात तब्बल 11 केसेस दाखल झाल्या काही तुन मुक्त झालोय तर काही निस्तारात आहे. मात्र या समाजात जगत असताना 30 वर्षांत 300 वर्षांचा अनुभव नक्की आला आहे.
याच काळात संबंध महाराष्ट्राभर हजारो जिवाभावाचे सहकारी जोडले आहेत. एखाद्याच्या अडचणीच्या काळात खरे खोटे न बघता ताकतीने साथ देत आलो म्हणून तर हजारो जीव लावणारे निर्माण झाले आहेत. नगर दर्शन व्रत्तपत्र चालवीताना अनेकांवर खोचक लिहिले यातून क्वचित सोडता केवळ सहकारीच निर्माण होत गेले.
सुरवातीचा काळ आर्थिक हालाकीचा होता मात्र पूर्वजांच्या पुण्याईने आज सशक्त झालोय आणि स्थिर स्थावर आणि मजबूत उत्पन्नाची साधने निर्माण केली आहेत. वकिलीचे शिक्षण घेतले मात्र त्या मार्गाला न जाता वेगळा मार्ग निवडला.
31व्या वर्षात पदार्पण करताना मागील वाईट काळ पुढील सुवर्णाकाळाचा पाया बनून सोबत उभा आहे.
शेवटी पुन्हा सर्वांचे खूप खूप आभार
आणि आपले हे ऋणानुबंध कायम राहतील हीच अपेक्षा ज्यांना टाळले त्यांनीही वाईट मानू नये कारण आयुष्यात बेरीज वजाबाकी केली नाही तर गणित सुटत नसते. आणि मला तर अजिबात पच्छाताप नसेल
खुप खुप धन्यवाद.
कुणाल द. गायकवाड
अहमदनगर
मो 9049060040

