shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाखा अभियंता श्री संदीप बराट यांनी औद्योगिक ग्राहकाला ठोठावला तब्बल 45 लाख रुपये दंड..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

अहमदनगर  :- अहमदनगर तालुक्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अभियंता श्री संदीप बराट यांच्याकडे सध्या कौडगाव शाखेचा अतिरिक्त पदभार आहे.  दिनांक 22 ऑगस्ट रोजी व उपकार्यकारी अभियंता श्री  किसन कोपनर व संदीप बराट यांनी अनेक दिवसांपासून महावितरणच्या रडारवर असलेल्या औद्योगिक ग्राहकाला धाड टाकून चोरी करत असताना पकडले , औद्योगिक ग्राहक खूप मोठ्या प्रमाणात वीज चोरी करत असताना आढळून आल्यानंतर सदर जागेचा पंचनामा करून ग्राहकाला तब्बल 45 लाख 64 हजार 940 रुपये इतका जबरी दंड शाखा अभियंता संदीप बराट यांनी ठोठावला आहे.

ग्राहकाला दंड भरण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती परंतु यानंतरही ग्राहकाने दंड न भरल्यामुळे दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अहमदनगर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 601 भारतात विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पुढील तपास सब इंस्पेक्टर राजेंद्र सानप करत आहेत.     


                    

राजकीय हस्तक्षेप करू नये असे आव्हान.                                             

वीज चोरांची कुठलीही गय केली जाणार नाही, वीज चोरी हा राज्याला लागलेला शाप असून प्रसंगी वीज चोरांवर यापुढेही कठोर कार्यवाही केली जाईल. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप करू नये.विकासाची कामे असल्यास अवश्य सांगावीत या दृष्टीने निश्चितच प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन ही शिर्डी एक्सप्रेसची बोलताना अभियंता संदीप बराट यांनी केली.

close