shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या सिंगल फेज डिपीचे साबला येथे भूमिपूजन संपन्न !!

===================================

  प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या सिंगल फेज डिपी कटारेवस्ती , व नाईकनवरे वस्ती साबला येथील सिंगल फेज डिपीचे भूमिपूजन माननीय अक्षय भैय्या मुंदडा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .


या बाबत अधिक माहिती अशी की सध्या केज तालुक्यात सर्वत्र खरीपाची पिके जोमदार आली होती . परंतु पावसाने दडी मारल्यामुळे सदरील ही धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. आता हि पिके वाचवायची कशी या चिंतेने तो चिंताग्रस्त होता. कारण पिकांना पाणी देण्यासाठी लाईटची आवश्यकता आहे. आणि केज तालुक्यातील साबला सह इतर गावात पुरेशी लाईट नसल्याने शेतकऱ्यांची फडफजीती होती. 



ही बाब  केजच्या आमदार सौ. नमिताई मुंदडा यांच्या लक्षात आल्याने  त्यांनी तात्काळ आपल्या आमदार फंडातून  शिंगलफेज डि.पी.चे नियोजन करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. या शिंगलफेज डि.पी.चे भुमीपुजन   कार्यक्रम आमदार प्रतिनिधी माननीय. श्री. अक्षय भैय्या मुंदडा यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अक्षय भैय्या मुंदडा तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव सुर्यवंशी - अध्यक्ष - व्यापारी संघ तालुका केज ,  शरदराव इंगळे - युवा नेते भाजपा ,  सुरेशजी नांदे - मुख्याध्यापक - वसुंधरा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा केज  , अतुलराजे इंगळे केज ,  मुंडे साहेब - सहाय्यक अभियंता केज (ग्रामीण ), शिवाजी घुले साहेब लाईनमेन कानडी सबस्टेशन कानडी सज्जा. डिकले लाईनमन साहेब केज ,  वळसे साहेब केज , 

             

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्ताविक आदर्श शिक्षक  नरहरी शहाजी काकडे यांनी केले . प्रस्ताविक करत असताना स्व . डॉ . विमलताई मुंदडा यांनी साबला या छोट्याशा गावात केलेल्या विकास कामाचा आढावा गावातील नागरिकांच्या समोर मांडला स्व . विमलताई यांनी शाळेसाठी चार रूम बांधून दिल्या ,दोन सभागृह बांधून दिले , गावात सिमेंट रस्ता दिला , बौध्दवस्ती मध्ये बौद्ध समाजासाठीही सभागृह बांधून दिले . शेतातील लाईटचे काम असेल , शासकीय दवाखाण्यातील काही काम असेल , तर आजही आदरणीय काकाजी हे काम तातडीने करतात . तसेच कानडी माळी ते साबला व साबला ते तरनळी , साबला ते धर्माळा या रस्त्याचे मजबूती करण ही स्व . विमलताई मुंदडा यांच्याच कार्यकाळात झाले होते .

          

तसेच आणखी गावातील काही मागण्याचे निवेदनही  अक्षय भैय्या मुंदडा यांना देण्यात आले . त्यामध्ये साबला ते उमरी व साबला ते कोल्हेवाडी तसेच गावातील वस्ती रस्ते दत्त वस्ती रस्ता , नाईकनवरे वस्ती रस्ता, बौध्द समाजासाठी स्मशानभूमी , नाईकनवरे यांच्यासाठीही स्मशानभूमीची मागणी करण्यात आली .

         

अक्षय भैय्या मुंदडा यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना त्यांनी त्यांच्या मनोगतातून  साबला या गावातील जे काही विकासात्मक कामे राहिली असतील ती करण्याच काम मी येणाऱ्या कार्यकाळात करेल अस आश्वासन दिल . ज्या प्रमाणे स्व . विमलताई मुंदडा यांनी केज विधान सभा मतदार संघाचा विकास केला. तशाच प्रकारचा विकास करण्याच काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या कार्यकाळात केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली .

         

तसेच या कामासाठी जागा उपलब्ध करून देणारे शिवश्री गणेश दशरथ कटारे यांचा सत्कार  अक्षय भैय्या मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला .

        

तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवश्री अरुण राऊत , शिवश्री भैरवनाथ चाळक , शिवश्री अशोक नाईकनवरे, शिवश्री रामराजे शिंदे, शिवश्री अशोक काकडे , शिवश्री पोपट काकडे, शिवश्री रंगनाथ काकडे , शिवश्री मधुकर नाईकनवरे , शिवश्री उध्दव नाईकनवरे , शिवश्री सोपान नईकनवरे , शिवश्री लखन राऊत , शिवश्री दशरथ कटारे , शिवश्री लखन कटारे , शिवश्री इंटर नाईकनवरे , शिवश्री गणेश सरवदे , शिवश्री श्रीमंत नाईकनवरे , शिवश्री अनिल भोसले , शिवश्री दिलीप नाईकनवरे, शिवश्री प्रकाश नाईकनवरे इत्यादिंच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  शिवश्री लखन कटारे यांनी मानले .

close