सायबर गुन्हयांतील 5 आरोपी दिल्ली येथुन अटक
बुलढाणा । अनिल मंजूळकर
बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन खामगाव शहर, किनगावराजा, बुलडाणा शहर चे कार्यक्षेत्रात इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जींग पॉईंट देण्याचे नावाखाली नागरीकांची लाखो रुपयांची फसवणुक झालेली असल्याने पो.स्टे. बुलडाणा शहर अप.नं. 53/2022 कलम 66 क, ड, आय.टी. ॲक्ट, खामगाव शहर अप.नं. 24/2022 कलम 420, 465, 468, 471, भादंवि सहकलम 66 (क),(ड) आय.टी. ॲक्ट, किंनगाव राजा अप.नं. 124/2022 कलम 415, 420 भादंवि सहकलम 66 क, ड, आय.टी. ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल झाल्याने सदर क्लिष्ट स्वरुपाचे गुन्हंयाचा तात्काळ तपास करणेसाठी श्री. अरविंद चावरिया, पोलीस अधिक्षक, बुलडाणा, श्री. श्रवण दत्त, अपर पोलीस अधिक्षक खामगाव यांनी सायबर व स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याकरीता पोलीस निरीक्षक बळीराम गिते, स्थागुशा व पो.नि.अनिल बेहेरानी, सायबर यांना सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयातील आरोपी इलेक्ट्रो इव्ही पॉइंट घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेक वेबसाईट तयार करुन त्याची फेसबुक इन्स्टाग्राम व व्हाटसअप द्वारे जाहिरात करतात व चार्जींग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जींग पॉईंट घेणाऱ्या उमेदवारास भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबत प्रलोभन देतात व त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही फक्त रजिस्ट्रेशन फि भरावी लागणार असल्याचे सांगुन ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन फि भरलेली आहे त्यांची वेगवेगळया कारणासाठी जसे डिस्कॉम फि, टॅक्स, जिएसटी टॅक्ससाठी बॅकामध्ये पैसे भरण्याचे सांगतात या प्रकारे ग्राहक जो पर्यंत पैसे भरत असतो तो पर्यंत त्यास पुन्हा पुन्हा रकमेची मागणी केल्या जाते याप्रमाणे पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे फिर्यादी जुबेर रीजवान बुरानी यांनी दिनांक 7/1/2022 रोजी, फिर्यादी गणेश भगवान शिंगणे रा.किनगावराजा यांनी पो.स्टे. किनगावराजा येथे दिनांक 17/6/2022 रोजी आणि पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे दिनांक 27/1/2022 रोजी फिर्यादी पवनकुमार देशमुख यांनी दिलेल्या रीपोर्टवरुन कलम 420,465,468,471 भादवी सहकलम 66 (क),(ड) आय.टी. ॲक्ट नुसार वेगवेगळया ठिकाणी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन दाखल गुन्हयातील फसवणुक झालेली एकुण रक्कम 26 लाख इतकी आहे.
दाखल वरील तिन्ही गुन्हयात आरोपींनी एकसारखी गुन्हे करण्याचे पध्दतीचा अवलंब केलेला असुन फिर्यादी यांचेकडुन ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी ते केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या मान्यता प्राप्त संस्थेचे कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवुन रिजर्व बँक ऑफ इंडीयाचे डीपॉझीट सर्टीफिकेट ,पेमेंट रीसीप्ट, पब्लीक चार्जींग स्टेशन ॲग्रीमेंट , डिस्कॉम फि, टॅक्स, जिएसटी टॅक्स इत्यादीचे नावाखाली ऑनलाईन रक्कमा त्यांचे वेगवेगळया खात्यात वळवुन फिर्यादी यांना केंद्रीय संस्थेकडुन इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जींग पाँईंट मंजुर करण्यात आला असल्याचे तसेच केंद्रीय पथकाकडुन निर्धारीत केलेल्या जागेचे परीक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच त्यांचे पत्यावर येवुन निरीक्षण करणार आहेत असा विश्वास देवुन फिर्यादी यांचे राहते पत्यावर व व्हाटस्ॲपवर केंद्रीय पथकाचा लोगो असलेल्या पेपरवरील मंजुरीच्या ऑर्डर स्पीड पोस्टाने पाठविण्यात आलेल्या आहेत त्यामुळे फिर्यादी हे त्यांना इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जींग पाँईंट मंजुर झाल्याचे समजतात व त्यानंतर फिर्यादी यांचेकडुन मागणी केलेली रक्कम पुर्ण झाल्यानंतर आरोपीचे टिमचे सदस्य फिर्यादी यांना संपर्क करण्यासाठी वापर केलेले मोबाईल क्रमांक बंद करतात. अशा प्रकारे बुलढाणा जिल्हयातील खामगाव ,किनगावराजा ,बुलढाणा येथील नागरीकांच्या ऑनलाईन फसवणुक झालेली आहे. सायबर टिम ने केलेल्या तपासात आरोपीकडुन मोबाईल हॅन्डसेट-08, लॅपटॉप-1, हॉटस्पॉट-1, डेबीट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक, नगदी-73780/- रुपये, बॅकेमध्ये गोठविण्यात आलेली रक्कम-264491 रुपये असा एकुण 5,42,271/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी श्री. अरविंद चावरिया, पोलीस अधिक्षक, बुलढाणा, श्री. श्रवण दत्त, अपर पोलीस अधिक्षक, खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गिते, स्थागुशा, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, सायबर, यांचे नेतृत्वात सपोनि विलासकुमार सानप, स्थागुशा, सपोनि दुर्गेश राजपुत, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजु आडवे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, राजदिप वानखडे, आनंदा हिवाळे ,कैलास ठोंबरे, निलेश चाटे, अजीस परसुवाले, उषा वाघ व चालक अविनाश मुंढे, शोहेब अहमद यांनी पार पाडलेली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना व त्यावरील ऑनलाईन जाहीरातीची खात्री पडताळणी केल्यानंतरच कोणताही ऑनलाईन व्यवहार करावा व ऑनलाईन फसव्या जाहीरातीच्या फसव्या आमीषाला बळी पडुन आपली आर्थीक फसवणुक करुन घेवु नये असे आवाहन पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, बुलढाणा यांनी केले आहे.
(अनिल बेहेरानी)
सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा

