खासदार उदयनराजे भोसले यांचेवर दु:खाचे डोंगर..
छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसलेंचे वृध्दापकाळाने निधन
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा पार्थिव अदालत वाड्यात आणणार येणार आहे. अंत्यसंस्कार उद्या, बुधवारी होणार आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे ते चुलते आहेत. पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर उद्या गुरुवारीअंत्यसंस्कार होणार आहेत. 1985 ते1991 दरम्यान ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचे शिल्पकार ते आहेत..!

