मेहकर । अनिल मंजूळकर:-
मेहकर उपविभागाअंतर्गत येणाऱ्या लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या गाईला लंपी सदृश्य आजाराची लागण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याअभावी अजून आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर डिगंबर फुके यांच्या गाईला लंपी सदृश्य आजाराची लागण झाली असून याबाबत सदर शेतकरी गाय तपासण्यासाठी अंजनी खुर्द येथील पशुवैद्यकीय दवाखानाश्रेणी दोन या ठिकाणी घेऊन गेला असता डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक शिपायाने गायची दोन दिवस तपासणी केली त्यानंतर सदर आजार हा लंपी असल्यामुळे 13 सप्टेंबर रोजी लोणार येथील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेवरे यांना अंजनी खुर्द येथे पाठवले असता सदर डॉक्टरांनी गाई वर उपचार केले.
अंजनी खुर्द येथे 1964 65 या काळात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन बांधण्यात आला होता या ठिकाणी एक डॉक्टर व एक परिचारक असे पद देखील नियुक्त होते.
या पशुवैद्यकीय दवाखान्यात शिवनी पिसा राजनी धानोरा खळेगाव कारेगाव महार चिकना खापरखेड सोमठाणा कोयाळी उदनापूर आधी गावातील शेतकरी आपल्या जनावरांना उपचारासाठी घेऊन येत असत परंतु काही वर्षापासून अधिकारी पद रिक्त असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरचा जनावरांच्या उपचारासाठी आधार घ्यावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे अंजनी खुर्द येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी या परिसरातील पशुपालकांकडून होत आहे.
अंजनी खुर्द गावामध्ये गत काही दिवसापासून लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे गावातील शेतकऱ्यांच्या गाईला दिसल्यामुळे भीतीचे वातावरण झाले असून पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी तज्ञ डॉक्टरची नियुक्ती करावी संजय गायकवाड
पशुपालक अंजनी खुर्द

