shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाइन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई च्या वतीने शिक्षक दिन साजरा


शिर्डी । प्रतिनिधी  ( संजय महाजन ):- 
आज दि ५/९/२०२२ रोजी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री गणेश इंटरनॅशनल स्कुल कोऱ्हाळे येथे शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम येथे कर्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

       १५० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन लायन्सचे प्रांतपाल ला.राजेशजी कोठावदे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष स्थानी साईबाबा संस्थांचे विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर होते. कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष ॲड.संदीप एकनाथ गोंदकर यांनी केले होते. या प्रसंगी रिजन चेअरमन ला सुनील साठे, झोन चेअरमन ला सुधीर डाग, ला प्रवीण गुलाटी, ला डॉ संजय उबाळे, ला दिपक दंडवते, ला परेश उदावंत, ला रघुनाथ गोंदकर, ला महेश वैद्य, ला वाल्मिक तुराकणे, ला भास्कर निर्मळ, ला सुभाष घुगे, ला बाबासाहेब चौधरी, ला कमलेश धाडीवाल, ला भाऊसाहेब लवांडे, ला विजय थोरात, ला धनंजय आठरे, ला सचिन कोते, ली हर्ष पारख, ली यश वालझडे, ली दर्शन वैद्य, सौ शोभाताई गोंदकर, सौ ॲड.श्वेता गोंदकर, सौ सुनीता आठरे, सौ सुरेखा रणमाळे, सौ रजनी गोंदकर, सौ शोभा लवांडे, सौ मनीषा चौधरी, डॉ शीतल खांदे इ मोठया संख्येने उपस्थित होते.
close