shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.का.ल.शिंदे पाटील शैक्षणिक संस्काराचे विद्यापीठ - दुर्गाताई तांबे


राहाता- येथील शारदा शैक्षणिक संकुलामध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी कै. का.ल.शिंदे पाटील यांचा स्मृतिदिन व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी आपल्या मनोगतातून का.ल.शिंदेपाटील यांचा जीवनपट उलगडताना का.ल.शिंदे पाटील हे एक सर्वसमावेशक असे व्यक्तिमत्व होते.इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्यासाठी अनेक युवकांनी भाग घेतला.प्रसंगी तुरुंगवास भोगला का.ल.शिंदेपाटील तसेच सहकारमहर्षी कै.भाऊसाहेब थोरात यासारख्या स्वातंत्र्यसेनानीनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊन देश इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी आपले जीवन पणाला लावले.स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही का.ल.शिंदे पाटील यांचे कार्य थांबलेले नव्हते.त्यांनी शैक्षणिक कार्यात उडी घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राहता गावात शारदा शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्याचे भव्य अशा वटवृक्षात रूपांतर झाले.

       का.ल.शिंदे पाटील यांचे संस्कार भावी पिढीमध्ये रुजविणे हे गरजेचे आहे.कारण अशा व्यक्तींचे संस्कार पाझरत पाझरत आपणापर्यंत आलेले असतात.आणि हे संस्कार आपण शिक्षक या नात्याने पुढील पिढीला दान करण्याचे कार्य आपणाला करायचे असते.कारण शिक्षक या देशाचे आधारस्तंभ तसेच आपले विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक होणार आहे.याची जाणीव ठेवून आपले कार्य पुढे नेटाने चालू ठेवत असतात. आणि त्यांनी ते अधिक खंबीरपणे पुढे न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

          याप्रसंगी अध्यक्ष मनोगतातून साध्वी प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक प्राचार्य इंद्रभानजी डांगे सर यांनी आपल्या अमृतवाणीतून शारदा शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचे वैभव केवळ आणि केवळ का.ल.शिंदे पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेले आहे.त्यांची साधी कार्यपद्धती व भविष्यकाळाचा वेध घेणारी विचारप्रणाली यामुळे ते पूर्ण परिसराचे भाऊ झाले.ते जनतेच्या मनात कालही भाऊ होते,आजही भाऊ आहेत, उद्याही भाऊ राहतील.त्यांनी पंचक्रोशीतील वाद मिटवण्याचे काम केले. थोडक्यात ते एक परिसराचे न्यायालय होते.त्यांचे कार्य राहता शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहे.यासाठी राहता शहराचा इतिहास लिहिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली कारण भविष्यात इतिहास कामाला येत असतो.त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आपणाला या शारदा शैक्षणिक संकुलाचा विस्तार करणे गरजेचे आहे.या संकुलाची भव्य इमारत होण्यासाठी आपणा सर्वांच्या प्रयत्नाची गरज आहे.प्रसंगी त्यांचे सुपुत्र रमेशभाऊ शिंदे पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचे मेळावे घेऊन आव्हान करावे व कार्य तडीस न्यावे.यासाठी प्रसंगी मी ही योगदान देण्यास तयार आहे असे सांगितले.
    याप्रसंगी श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव सदाफळ यांनी का.ल.शिंदे पाटलांच्या कार्याचा आढावा घेताना राहता पंचक्रोशीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष शिंदे पाटलांनी फोफावला या पुढील काळात शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये संस्काराचे धडे येण्याची गरज आहे.उदाहरणार्थ 1942 चा लढा याची नगर जिल्ह्यामध्ये प्रथमतः राहता येथे सुरुवात झाली यामध्ये का.ल.शिंदे पाटील, स्वामी सहजानंद भारती, विठ्ठलआप्पा सदाफळ, वारूभाऊ मेहत्रे यासारख्या स्वातंत्रसैनिकांनी कार्य केले.या स्वातंत्रसैनिकांचे बलिदान व कर्मवीरांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे तसेच देशाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात.
           याप्रसंगी का.ल.शिंदे पाटील यांच्या सुकन्या प्रा.सौ.मंगलाताई पाटील यांनी भाऊंच्या त्रिसूत्रीचा विचार उपस्थितांसमोर मांडला.आपले व्यक्तिमत्व आपण घडवले पाहिजे असे भाऊंचे विचार होते.पहिला आपला गुरु आई असते.का.ल.शिंदे पाटील यांना त्यांच्या आईने घडवले म्हणून ते एवढे कार्य करू शकले.त्यांच्या या कार्याचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपणाला करायचे आहे.कारण टी.व्ही.व मोबाईलच्या अनावश्यक वापरामुळे संस्कार लोप पावत चालले आहे.भाऊंचे कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
       याप्रसंगी भाऊंची पणती (चौथी पिढी) कु.श्रुती विखे हिने भाऊंना आपल्या आईने दिलेली शिकवण त्यातील इंग्रजांची नोकरी नाकारण्याचे केलेले आव्हान या गोष्टीचा संदर्भ दिला.
             स्मृतिदिनाचे ओचित्य साधून का.ल.शिंदेपाटील राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या.तीन गटांमध्ये प्रत्येकी तीन स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या कु.रेणुका लुटे व कु.प्रज्ञा वाणी यांनी आपल्या वक्तृत्वातून उपस्थितांची मने जिंकली. का.ल.शिंदे पाटील राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा फिरता चषक राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर कोळपेवाडी यांना प्रदान करण्यात आला.तसेच याप्रसंगी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
             याप्रसंगी श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव कार्ले,नरेश राऊत फाउंडेशन सचिव प्रा.लक्ष्मणराव गोर्डे,का.ल.शिंदेपाटील यांच्या धर्मपत्नी श्रीमती रुक्मिणीबाई शिंदे,कन्याविभागाच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या ब्राह्मणे,गणेशचे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी,प्राचार्य राजेंद्र बर्डे,श्री.साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाश दंडवते,रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्या विमलताई आगवन, सुरेश शिंदे,अशोक शिंदे,अलकाताई सालके,शोभाताई पगार,अर्चनाताई शिंदे,डॉ.पी.जी.गुंजाळ,प्रभावती दंडवते,माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सर्जेराव मते,प्राचार्य नानासाहेब मते,दिलीपराव रोहम,भगवानराव टिळेकर,ज्ञानेश्वर गुंजाळ,मिलिंद बनकर,सुहास वाबळे ॲड.मुरादे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
        सदर कार्यक्रम प्रसंगी का.ल.शिंदे पाटील यांच्या स्मरणार्थ शिक्षकदिनी दिला जाणारा कृतिशील शिक्षक पुरस्काराने धरमदास वसावे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.शरद गमे,ज्येष्ठ शिक्षक ज्ञानदेव गमे,कलाशिक्षक विजय जेजुरकर,पर्वत उर्हे,प्रमोद तोरणे,राजकुमार साळवे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य संजय तरटे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.रमेश आहेर व राजेंद्र पाठारे यांनी तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेशभाऊ शिंदे पाटील यांनी मानले.
close