shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासनाने किमान ३००० रुपये दराने कांदा खरेदी करावा- सुरेशराव लांबे पाटील..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                      मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२

शासनाने किमान ३००० रुपये दराने कांदा खरेदी करावा -सुरेशराव लांबे पाटील..!!

राहुरी : आज कांद्याला ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल असे सरासरी भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने ३००० त्वरित निर्यात चालू करून नाफेड मार्फत किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून यावर्षी बाजार समिती मार्फत विक्री झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.
       गेली दोन वर्षापासुन कोरोना लाॅकडाऊन, अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यातच शासनाची कुठलीच मदत मिळत नसल्याने चालु वर्षी पुर्ण खरीपातील पिके सततच्या पावसामुळे उपळुन गेली आहेत. काही पिकांचे अल्प प्रमाणात पंचनामे करुन तुटपुंजी मदत देऊन शासन शेतकऱ्यांचे समाधान करण्याच्या मार्गावर आहे. संपुर्ण देशामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यातच डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, मजुरी, कीटकनाशके यांचे दर खुपच वाढलेले असुन एक एक्कर कांदा लागवडीपासुन ते भुसार स्टाॅक करेपर्यत किमान नव्वद हजार ते एक लाख पर्यत खर्च येतो. दररोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरत असलेला कांद्याचा जीवनावश्यक वस्तुमध्ये समावेश करुन व निर्यात शुल्क वाढवून बाहेर देशामध्ये मागणी असतानाही सरकार कांद्याची निर्यात करत नसुन कायमच कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.

       शेतकर्यांनी कांदा एप्रिल-मे महिन्यात काढलेला असून भुसा-यामध्ये ठेवून त्याला आज रोजी पाच ते सहा महिने झाले आहे. त्यात ३० ते ४० % घट झालेली असल्याने आज कांद्याला किमान ३००० रुपये भाव मिळाला तरच शेतकरी, कष्टकरी बळीराजाला दोन पैसे हातात येईल. शासनाने त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तसेच बाजार समितीत पदाधिकारी व व्यापार्यांच्या संगनमताने भावात गोलमाल केले जाते. त्याकडे शासनाने लक्ष घालावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिश्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close