shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच हातभट्टी स्थळांवर राहुरी पोलिसांच्या धाडी, मुद्देमाल जप्त..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                      शुक्रवार  दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ 

गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच हातभट्टी स्थळांवर राहुरी पोलिसांच्या धाडी, मुद्देमाल जप्त..!!

राहुरी : गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच 4 वाजता राहुरी पोलिसांच्या धाडी पडल्याने हातभट्टी तयार करणारांचे धाबे दणाणले आहेत. राहुरी तालुक्यात दोन नंबर धंदे करणा-यांना चाप बसायला नक्कीच सुरुवात झाली आहे. राहुरी तालुक्याचा पोलिस विभाग आता ॲक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे . आजच्या या धडक कारवाईने दोन नंबर धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
           राहुरी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार देवळाली प्रवरा, फॅक्टरी, लाख या ठिकाणी हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे 2000 लिटर रसायन व 2500 लिटर हातभट्टीची दारू असा 1,36,400 / - रूपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

       सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार करण्यात आली असून या कारवाईमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मत राहुरीचे पो.नि. प्रताप दराडे यांनी सांगितले आहे.
      हातभट्टीवर धडक कारवाई करण्यासाठी राहुरी पोलिस स्टेशनचे पो.स .ई . सज्जनकुमार न-हेडा, ज्योति डोके, रमीझपात्र, पो. ह. पारधी, पो.शि. लिपणे, गुणवंत, शिरसाठ, कु-हाडे व धाकणे यांचा समावेश होता . गणेश विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या कार्यवाहीमुळे राहुरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच सर्व गणेशभक्तांनीही या कार्यवाही बदद्ल राहुरी पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       

close