shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी - संजय यादव


अखिल भारतीय एकता पार्टी ने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

पुणे: दि. ४  / गुजरात मध्ये झालेल्या दंगली बिल्कीस बानो यांच्यावर झालेला अत्याचार व त्यांच्या मुलांसहीत नातेवाईकांची हत्या अशा विकृत आरोपींना सत्र न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली असताना सध्या  गुजरात मध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारने त्या नराधमांना निर्दोष सोडण्याचा जो पराक्रम केला व त्यांचा फुल, माळा घालून सत्कार केला जातो हे निंदयनीय आहे. 

अशा नराधमांना बाहेर न सोडता त्यांना त्वरीत अटक करावी व जी त्यांना शिक्षा दिली गेली होती ती पूर्ववत ठेवावी. बिल्कीस बानो यांना न्याय द्यावा तसेच झारखंडमधील दुमका येथील रहिवासी  अंकिता सिंह हिच्यावर ज्वलनशील द्रव्य टाकून जाळल्या गेलेल्या अल्पवयीन मुलीचा मॄत्यू झाला त्याला कारणीभूत असलेला शाहरूख हुसेन या नराधमावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या महिला व अल्पवयीन मुलींवर पाशवी अत्याचार करणार्यान वर कठोर कारवाई करावी.

इथे कोणत्याही जाती धर्माचा विषय नसून ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्या विरोधात अखिल भारतीय एकता पार्टी येणा-या काळात रस्त्यावर उतरून माता, भगिनींना न्याय देण्यासाठी प्रशासनास जाब विचारेल याची नोंद घ्याव असे निवेदन अखिल भारतीय एकता पार्टी तर्फ जिल्हाधीकाऱ्यांना देण्यात आले.
close