शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२२
श्री. गणपत रंगनाथ जाधव गुरुजी यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान..!!
देहरे : बहुजन रयत परिषदेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार देहरे गावचे रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री गणपत रंगनाथ जाधव गुरुजी यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर, अहमदनगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैय्या जगताप यांच्या उपस्थितीत व महिला प्रदेश उपाध्यक्ष कोमलताई साळुंखे व प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रा. ना. म. साठे सर यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बापूसाहेब गायकवाड सत्यवान नवगिरे सूर्यवंशी साहेब यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

